Agriculture news in Marathi Sant Gadge Baba spinning mill should be started: Nana Patole | Agrowon

संत गाडगेबाबा सूतगिरणी सुरू करावी ः नाना पटोले

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी तसेच रोजगारसंधी विस्तारल्या जाव्यात या दृष्टीने दर्यापूर (जि. अमरावती) येथील संत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणी मर्यादित सुरू व्हावी, यासाठी सहकार विभाग, वस्त्रोद्योग विभाग व राज्य सहकारी बँक यांनी एकत्रितरीत्या पावले उचलण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी (ता. २७) दिले आहेत.

अमरावती : कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी तसेच रोजगारसंधी विस्तारल्या जाव्यात या दृष्टीने दर्यापूर (जि. अमरावती) येथील संत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणी मर्यादित सुरू व्हावी, यासाठी सहकार विभाग, वस्त्रोद्योग विभाग व राज्य सहकारी बँक यांनी एकत्रितरीत्या पावले उचलण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी (ता. २७) दिले आहेत.

अमरावती जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यासाठी तसेच दर्यापूर येथील संत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणी यासह इतरही संस्थांबाबत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा होत आहे. त्याअनुषंगाने श्री. पटोले यांच्या दालनात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस पालकमंत्री यशोमती ठाकूर, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, वस्त्रोद्योग विभागाचे राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार बळवंतराव वानखेडे, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजीव मित्तल, वस्त्रोद्योगाचे प्रधान सचिव पराग जैन आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. पटोले म्हणाले की, ही सूतगिरणी पूर्ण क्षमतेने सुरू होणे आवश्यक असून त्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना दिलासा मिळेल. त्याचप्रमाणे तरुणांना रोजगार संधीही प्राप्त होईल. त्यादृष्टीने संबंधित सर्व विभागांची भूमिका महत्त्वाची असून, त्यासंदर्भात एक महिन्याच्या आत तातडीने कार्यवाही व्हावी. संबंधित विभागांच्या मंत्री महोदयांनी यासंदर्भात सर्व संबंधितांची बैठक घेऊन पुढील कार्यवाही करावी अशा सूचनाही  पटोले यांनी यावेळी दिल्या. अंबादेवी साखर कारखाना पूर्ववत सुरू करण्याच्या अटींवर विकला गेला आहे. संबंधित कारखाना खरेदी केलेल्या कायनेटीक पेट्रोलियम कंपनीवर नियमान्वये कारवाई करण्यात यावी. कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. संबंधित कारवाईचा अहवाल एक महिन्यात सादर करावा, असे आदेश पटोले यांनी अधिकाऱ्यांना दिले.


इतर ताज्या घडामोडी
पपई उत्पादकांना खर्चही निघेनाअकोला : पारंपरिक पिकांची चाकोरी सोडत शेतकरी...
मराठवाड्यात तुरीवरच शेतकऱ्यांचे आर्थिक...औरंगाबाद : यंदा अतिपावसाने उडीद, सोयाबीनचे अतोनात...
खडकपूर्णा धरणाचे आवर्तन अखेर सुरूबुलडाणा : देऊळगावराजा तालुक्यातील शेतकऱ्यांना...
...तर महावितरणचे कार्यालय जाळणार :  आ....अमरावती :  वरुड, मोर्शी तालुक्यांत...
मक्यावर अमेरिकन लष्करी अळीनगर  : नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा परिसरात...
पुण्यात भात काढणी अंतिम टप्प्यातपुणे  : दिवाळी सणामुळे भात पट्यात अनेक...
टेंभूचे आवर्तन सुरू करण्याची मागणीकडेगाव, जि. सांगली  : रब्बी हंगामासाठी टेंभू...
सांगलीत एफआरपीची प्रतीक्षासांगली : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस...
शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत ठाकरे सरकार...नांदेड : निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी...
बच्चू कडूंनी फुंकले रणशिंग; शेतकऱ्यांसह...अमरावती : तीन कृषी कायद्यांविरोधात देशातील...
डिसेंबरमधील पालवीवरच आंबा हंगाम अवलंबूनरत्नागिरी  : नोव्हेंबर महिन्यात थंडीऐवजी...
सुट्ट्यांमुळे कापूस खरेदीत खोडायवतमाळ : बहूप्रतिक्षेनंतर २७ नोव्हेंबरला...
कीड व्यवस्थापनासाठी करा जैविक पद्धतीचा...एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये जैविक कीड...
कळमना बाजारात मोसंबी दरात सुधारणानागपूर : मागणीअभावी संत्रा दरात घसरण झाली आहे....
कोल्हापुरात टोमॅटोला दहा किलोस १५० रुपयेकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
परभणीत दीड लाख क्विंटल कापसाची खरेदीपरभणी :  भारतीय कापूस महामंडळाच्या वतीने (...
जळगाव जामोदमध्ये कापूस खरेदी सुरूबुलडाणा : कापूस पणन महासंघाच्या वतीने हमी भाव...
सटाणा तालुक्यात चार कोटींची नुकसानभरपाई...नाशिक  : सटाणा तालुक्यात ऑक्टोबर आणि...
भंडाऱ्यात ३४ कोटींची धान खरेदीभंडारा  : जिल्ह्यात आधारभूत दराने धान...
निम्न दुधानाचे बुधवारपासून आवर्तनपरभणी  : जिल्ह्यातील ब्रम्हवाकडी (ता. सेलू)...