agriculture news in Marathi sant gajanan maharaaj prakat din sohla Maharashtra | Agrowon

संत गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

शेगाव, जि. बुलडाणा ः विदर्भाच्या पंढरीत शनिवारी (ता.१५) संत गजानन महाराज यांच्या १४२ व्या प्रगट दिनी लाखो भाविकांनी गर्दी केली. भाविकांच्या अलोट उपस्‍थित गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा झाला. शहरात सर्वत्र ‘गण गण गणात बोते’चा गजर सुरू होता.

शेगाव, जि. बुलडाणा ः विदर्भाच्या पंढरीत शनिवारी (ता.१५) संत गजानन महाराज यांच्या १४२ व्या प्रगट दिनी लाखो भाविकांनी गर्दी केली. भाविकांच्या अलोट उपस्‍थित गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा झाला. शहरात सर्वत्र ‘गण गण गणात बोते’चा गजर सुरू होता.

प्रगट दिनानिमित्त गेल्या तीन चार दिवसांपासून राज्यातील दिंड्याचे शेगावमध्ये आगमन सुरू झाले होते. प्रगटदिन सोहळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या महारूद्र स्वाहाकार यागाची पूर्णाहुती व ब्रह्मवृंदाच्या उपस्थित अवभृतस्नान सकाळी १० वाजता झाले. यानंतर दुपारी २ वाजता श्रींच्या रजत मुखवट्यासह पालखी सोहळा निघाला. यात घोडे, हत्ती, सजवलेला रथ, मेणा, शेकडोच्या संख्येत भगवे पताकाधारी, राज्यभरातून आलेले वारकरी सहभागी झाले. 

पालखी सोहळा मंदिर परिसर, जुने महादेव मंदिर परिसर, संत सावता चौक, तीन पुतळे, फुले नगर, तेलीपुरा, बंकट सदन, फरशीवेस, स्वामी विवेकानंद चौक, भैरव चौक, आठवडी बाजार, बसस्थानक मार्गे, महाराजा अग्रसेन चौक, शिवाजी महाराज चौक, लोकमान्य टिळक चौक, गांधी चौक, जुने मंदिर रोड मार्गे नगर परिक्रमाकरिता श्रींचा पालखी सोहळा मार्गस्थ झाला होता. सायंकाळी उशिरा पालखी मंदिरात परतली. 

उत्सवाची उद्या सांगता
रविवारी (ता. १६) सकाळी ७ ते ८ यावेळेत हरीभक्त परायण प्रमोदबुवा राहणे (पळशी) यांचे काल्याचे कीर्तन होईल. यानंतर प्रगट दिन उत्सवाची सांगता होणार आहे. शनिवारी पालखीमार्गावर चौकाचौकात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. भाविकांनी पालखीवर फुलांची उधळण केली. ठिकठिकाणी भाविकांसाठी विविध सोयी-सुविधांची दालने उघडण्यात आली होती. विविध जाती-धर्माच्या लोकांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. 


इतर अॅग्रो विशेष
वाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे ...अमरावती  ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या...
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५९ वरमुंबई: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची...
देशातील कोरोनाबाधीतांची संख्या ८७३ वरनवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीतांची संख्या...
भाजीपाला विक्रीसाठी पुणे जिल्ह्यात...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील...
राज्यात १४७ कोरोनाबाधित रुग्ण मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत...
मासे, मत्स्यबीज, मत्स्यखाद्याच्या...मुंबई : केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मासे...
सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेतातच विकले...पुणे ः वाहतूक बंद, मार्केट बंद, खरेदीदार...
कोरोनामुळे राज्यातील द्राक्ष बागेतच ‘...नाशिक/सांगली/सोलापूर: यंदाचा द्राक्ष हंगाम...
सागरी मार्गाने या देशांत निर्यातीसाठी...पुणे: युरोपला भारतातून विमानामार्गे होणारी...
दुधासाठी पाच रुपये अनुदान हवे पुणे: राज्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या...
विदर्भात आज गारपीटीचा इशारा पुणे : राज्याच्या विविध भागात पुर्वमोसमी पावसाने...
अडत्यांशिवाय पुणे बाजार समिती सुरु...पुणे : कोरोना विषाणू सारख्या आणीबाणी आणि...
लासलगाव येथे गोणी पद्धतीनुसार कांदा...नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या...
सर्व कर्जांच्या हफ्त्यांना तीन...मुंबई : कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी भारतीय...
राज्यात कोरोना बाधित ३ नवीन रुग्ण; एकूण...मुंबई : राज्यात कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे : राज्यात सुरु असलेला पुर्वमोसमी पाऊस...
केळी उत्पादकांचे दररोज सहा कोटींचे...जळगाव : केळी वाहतुकीसह परराज्यातील...
जलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच...अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवराज...
गरिबांसाठी १.७ लाख कोटींचे पॅकेज:...नवी दिल्ली : कोरोना विषाणूने देशात थैमान घालायला...
फळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘एसएओ’कडे ‘...पुणे : राज्यातील महापालिका व नगरपालिका...