जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
ताज्या घडामोडी
संत श्री नामदेव महाराज जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा
श्रीक्षेत्र नरसी नामदेव येथे संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा जन्मोत्सव गुरुवारी (ता.२६) हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला.
हिंगोली ः श्रीक्षेत्र नरसी नामदेव येथे संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा जन्मोत्सव गुरुवारी (ता.२६) हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला.
श्री. संत नामदेव महाराज यांच्या ७५० व्या जयंती सोहळ्यानिमित्त संत नामदेव मंदिर संस्थांकडून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरे करण्यात आले. गुरुवारी (ता. २६) सकाळी सहा वाजता मंदिर परिसरामध्ये लाखो पणत्या पेटवून दीपोत्सव साजरा करण्यात आला. यानंतर गायकवाड यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात आली.
आमदार तान्हाजी मुटकुळे, सुधीर अप्पा सराफ संजय बोंढारे, विनायक देशमुख, संस्थानचे उपाध्यक्ष भिकाजी कीर्तनकार, सुभाष हुले, रामराव सोळंके, भारत महाराज आदी उपस्थित होते. भाविकांनी तोंडाला मास्क लाऊन मंदिर परिसरामध्ये गर्दी केली होती. मंदिर परिसरामध्ये फुलांनी रांगोळ्या पणत्या लाऊन व मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती.
- 1 of 1022
- ››