agriculture news in marathi, sant namdev maharaj birth anniversary ceremony starts, hingoli, maharashtra | Page 2 ||| Agrowon

संत नामदेव महाराज जयंती महोत्‍सव सुरू
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

हिंगोली  ः तालुक्‍यातील नरसी नामदेव येथील संत नामदेव महाराज यांच्या ४७९व्या जयंती महोत्‍सवानिमित्त शनिवारपासून (ता. २) ते शनिवारपर्यंत (ता. ९) अखंड हरिनाम सप्‍ताह तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंगोली  ः तालुक्‍यातील नरसी नामदेव येथील संत नामदेव महाराज यांच्या ४७९व्या जयंती महोत्‍सवानिमित्त शनिवारपासून (ता. २) ते शनिवारपर्यंत (ता. ९) अखंड हरिनाम सप्‍ताह तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जयंती महोत्सवानिमित्त दररोज सकाळी चार ते सहा काकडा, दुपारी दोन ते चार संत नामदेव महाराज गाथा पारायण सोहळा, सायंकाळी चार ते पाच प्रवचन, पाच ते सहा हरिपाठ, रात्री आठ ते दहा कीर्तन व त्यानंतर हरिजागर कार्यक्रम सुरू आहेत. सप्ताहात दररोज सकाळी, दुपारी व सायंकाळी अन्नदानदेखील केले जात आहे. शुक्रवारी (ता. ८) सकाळी सात वाजता एकादशीनिमित्त तहसीलदार गजानन शिंदे व रामरतन शिंदे यांच्या उपस्‍थितीत महापूजा होणार आहे.

दरम्‍यान, सप्ताहात बुधवारी (ता. ६) उमाकांत महाराज नरसी, सुभाष महाराज जांभरून यांचे प्रवचन झाले. शनिवारपासून रात्री आठ ते दहा या वेळात सुरू झालेल्या कीर्तनात शिवसांब महाराज नरसी, केदारलिंग महाराज कडती, दामोधर महाराज वैजापूर यांचे कीर्तन झाले. बुधवारपासून (ता. ६) बंडू महाराज बीडकर, ग्यानदेव महाराज मकोडी, रमेश महाराज मगर यांचे कीर्तन होणार आहे. शुक्रवारी (ता. ८) दुपारी दोन ते चार या वेळेत संत नामेदव महाराज यांच्या पालखीची नगरप्रदक्षिणा होणार आहे. शनिवारी (ता. ९) भागवताचार्य भारत महाराज बेंगाळ कोळसेकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्‍यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.

या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संत नामदेव महाराज मंदिर संस्‍थान, परिसरातील भाविक मंडळी व ग्रामस्‍थांतर्फे करण्यात आले आहे.

इतर ताज्या घडामोडी
कलिंगडांच्या जनुकीय प्रदेशांचा घेतला...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट कलिंगडाच्या सात...
औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीसाठी दहा...औरंगाबाद : मक्याला किमान आधारभूत किंमत मिळावी,...
सांगली जिल्ह्यात यंदा पावसाची ‘रेकॉर्ड...सांगली : जिल्ह्यात गेल्या २० वर्षातील सर्वाधिक...
युरिया ब्रिकेटची पन्हाळा तालुक्यात शंभर...कोल्हापूर : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन...
परभणीत साडेचार लाख हेक्टरवर पिके वायापरभणी : ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे...
शिरपूर उपबाजारात सोयाबीनची आवक वाढलीशिरपूर, जि. वाशीम  : सलग सुरू असलेला पाऊस...
पणन संचालकपदी कोणाची वर्णी लागणार?पुणे ः शेतमाल विपणनच्या ३०७ बाजार समित्या, ९००...
धक्कादायक ! कांदा नुकसानीच्या...नाशिक  : चालू वर्षी दुष्काळामुळे होरपळून...
अमरावती : रब्बी हंगाम क्षेत्रात होणार...अमरावती ः मॉन्सूनोत्तर पाऊस खरीप पिकांच्या मुळावर...
‘भातकुली’वर पाणीटंचाईचे सावटअमरावती  ः सुरुवातीला उघडीप त्यानंतर...
पुणे विभागात रब्बीचा चार लाख हेक्टरवर...पुणे  ः ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत...
साताऱ्यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून...सातारा ः अतिपावसाने शेती क्षेत्राचे कोट्यवधींचे...
पुणे बाजार समितीत ‘ई-नाम’ची अंमलबजावणी...पुणे :  शेतीमालाच्या ऑनलाइन लिलावांतून...
माण तालुक्यात पीक पंचनाम्यांमध्ये...दहिवडी, जि. सातारा  : पावसाने जोरदार तडाखा...
राज्यात अखेर राष्ट्रपती राजवटमुंबई ः चौदाव्या विधानसभेसाठी कोणत्याच...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस...कोल्हापूर  : यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीच्या...
विमा प्रतिनिधी शोधताना शेतकऱ्यांची दमछाकयवतमाळ ः मॉन्सूनोत्तर पावसाने झालेल्या...
‘बुलबुल’ प्रभावित शेतकऱ्यांना मदत जाहीरभुवनेश्‍वर, ओडिशा:  राज्याला बुलबुल...
तण निर्मूलनातून तण व्यवस्थापनाकडेवास्तविक तण विज्ञानाचा संबंध विविध कृषी शाखांशी...
जळगावात कोबी १८०० ते ३००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...