संत श्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान

संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान
संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान

नाशिक  : आषाढी एकादशी वारीसाठी संत श्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याने मंगळवारी (ता. १८) त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान ठेवले. या वेळी हजारो वारकऱ्यांची मांदियाळी त्र्यंबकेश्वर नगरीत जमली होती. 

संत श्री निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर येथे विधिवत पूजा, भजन होऊन दिंडी रथासह मार्गस्थ झाली. पालखी वेशीबाहेर जाताच पावसाच्या रिमझिम सरी बरसल्या. सकाळी संत श्री निवृत्तिनाथ मंदिरात प्रमुख दिंडीचालक आणि आलेल्या पाहुण्यांना नारळ प्रसाद देण्यात आला. शासनाचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक श्रीकांत भारती या वेळी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते वारकऱ्यांना रेनकोटवाटप करण्यात आले. या वेळी मंदिर संस्थानचे अध्यक्ष हभप पंडित महाराज कोल्हे, सचिव जिजाबाई लांडे, पालखी सोहळा प्रमुख पुंडलिकराव थेटे, विश्वस्त त्र्यंबकराव गायकवाड, पुजारी व विश्वस्त हभप जयंत महाराज गोसावी, रामभाऊ मुळाणे, धनश्री हरदास आदी विश्वस्त, तसेच डॉ. महामंडलेश्वर लहवीतकर महाराज, गोसावी बंधू, माजी संस्थान अध्यक्ष मुरलीधर पाटील आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com