agriculture news in marathi, sant shree dynaeshwar maharaj palkhi sohola, pune, maharashtra | Agrowon

संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज प्रस्थान
सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जून 2019

आळंदी, जि. पुणे  ः 
सुखालागी जरी करिसी तळमळ, 
तरी तू पंढरीशी जाय एकवेळ, 
मग तू अवघाची सुखरूप होसी, 
जन्मोजन्मीचे दुःख 
ही भावना उरी बाळगून राज्यभरातून निघालेल्या हजारो वारकऱ्यांचा मेळा आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी तीन दिवसांपासून दाखल झाला आहे. इंद्रायणीत स्नानासाठी झालेल्या भाविकांच्या अलोट गर्दीने इंद्रायणीचे दोन्ही काठ फुलून गेले आहेत. आज संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे.

आळंदी, जि. पुणे  ः 
सुखालागी जरी करिसी तळमळ, 
तरी तू पंढरीशी जाय एकवेळ, 
मग तू अवघाची सुखरूप होसी, 
जन्मोजन्मीचे दुःख 
ही भावना उरी बाळगून राज्यभरातून निघालेल्या हजारो वारकऱ्यांचा मेळा आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी तीन दिवसांपासून दाखल झाला आहे. इंद्रायणीत स्नानासाठी झालेल्या भाविकांच्या अलोट गर्दीने इंद्रायणीचे दोन्ही काठ फुलून गेले आहेत. आज संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे.

गेले दोन दिवस वातावरण ढगाळ आहे. काळ्याभोर आभाळाच्या दाटीतून अधूनमधून सूर्याचे दर्शन होत आहे. रविवारी दुपारी चारनंतर पाऊस बरसला. पावसामुळे वारकऱ्यांची मुक्कामाच्या ठिकाणी थोडी त्रेधा उडाली. अनेकांनी धर्मशाळेचा आसरा घेतला. मात्र पावसाचे आगमन झाल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. मावळ भागातील आंद्रा धरणातून पाणी सोडल्याने आळंदी इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे भाविकांच्या स्नानाची चांगली सोय झाली.

पहाटेपासून भाविक इंद्रायणी काठी गर्दी करून होते. स्नानानंतर माउलींच्या समाधी दर्शनासाठी भक्ती सोपान पुलावर भाविक रांगेत उभे होते. दर्शनाची रांग नदीपलीकडे गेली होती. इंद्रायणी नदीत भाविक वाहून जाऊ नये यासाठी दोरखंड आणि रबर बोट तैनात केली आहे. स्पीकरवरून पोलिसांच्या वतीने वारंवार काळजी घेण्याबाबत भाविकांना सूचना देण्यात येत होत्या.

मंगळवारी माउलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा असल्याने दुपारनंतर दिंड्यांव्यतिरिक्त मंदिर परिसरात इतरांनी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले. मंदिर परिसरात गर्दी होऊ नये यासाठी प्रदक्षिणा मार्गावर विविध ठिकाणी स्क्रीनची सोय देवस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. प्रस्थानाचे थेट प्रक्षेपण वारकऱ्यांना दाखविले जाणार आहे. 

गेल्या तीन दिवसांपासून भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे साडेचारशेहून अधिक दिंड्या आळंदीत दाखल झाल्या. हरिनामाचा गजर आळंदीत सुरू आहे. ठिकठिकाणी कीर्तन प्रवचने सुरू आहेत. गोपाळपुरा, सिद्धबेट, इंद्रायणी नगर, पद्मावती रस्ता भागात भाविकांची गर्दी जास्त होती. 

देऊळवाड्याचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला. दीड ते दोन तासांच्या अंतराने भाविकांचे समाधी दर्शन होत होते. सकाळी बारापर्यंत माउलींच्या समाधीवर अभिषेक सुरू होते. दुपारनंतर महाद्वारातील पोलिसांचा बंदोबस्त कडक करण्यात आला. आळंदीतील रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. पालिकेच्या वतीने स्वच्छता आणि आरोग्यावर भर देण्यात आला.

इतर ताज्या घडामोडी
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
पीकविम्याला मुदतवाढ देण्याची ‘...अकोला ः या हंगामात पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै ही...
परडा येथे मक्यावर लष्करी अळीचा...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मक्यावर मोताळा...
अमरावती जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का...अमरावती  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३६१० रुपये...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
सातारा जिल्हा परिषदेचा १०० कोटींचा...सातारा : जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच मूळ...
पुण्यात पीकविम्यासाठी शिवसेना रस्त्यावरपुणे ः ‘कोण म्हणतो देणार नाय विमा घेतल्याशिवाय...
पुणे विभागातील कोरडवाहू पट्ट्यात टंचाई...पुणे : विभागातील पुणे, सातारा, कोल्हापूर...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उतरविला १...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गंत खरिपासाठी...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १५ चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील घटलेली चारा छावण्यांची...
अचूक पीक पेरणी अहवाल देणे शक्य नाही ः...बुलडाणा  ः जिल्ह्यातील पीक पेरणीचा...
आडसाली ऊस लागवडीला कोल्हापूर जिल्ह्यात...कोल्हापूर  : जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात...
परभणी कृषी विद्यापीठ उत्पादित अडीच हजार...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...
‘शेतकरी सन्मान’साठी ९१.३३ टक्के ...अकोला  ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम...
एचटी कापूस बियाण्यांबाबतचा अहवाल १५...मुंबई  : प्रतिबंधित एचटी (हर्बीसाइड टॉलरंट)...
शिवसेना शेतकऱ्यांची दिशाभूल करतेय ः...मुंबई  ः पीकविम्यासंदर्भात विमा कंपन्यांवर...
पीकविम्याचे पैसे पंधरा दिवसांत न...मुंबई  : कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांची...
फळपीक विमा योजनेला मुदतवाढ देण्याची...पुणे  : राज्यातील दुष्काळी स्थिती आणि...
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....