agriculture news in marathi, Sant Tukaram maharaj Palkhi came in Solapur district | Agrowon

संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 जुलै 2018

सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा ।
तुका म्हणे करा । जयजयकार आनंदे ।
असा भाव मनी धरून भक्तिचा डांगोरा पिठत, टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम''अशा जयघोषात बुधवारी (ता.१८) सकाळी पादुकांचे नीरास्नान उरकून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने जिल्ह्यातील अकलूज शहरात प्रवेश केला. त्यानंतर सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणावर भव्य असे तिसरे गोल रिंगण रंगले. अश्‍वांची नेत्रदीपक घाोडदौड आणि तुळस वृंदावन डोक्‍यावर घेऊन महिलांनी केलेला धावा, हे दृश्‍य जणू डोळे दीपणारे ठरले.

सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा ।
तुका म्हणे करा । जयजयकार आनंदे ।
असा भाव मनी धरून भक्तिचा डांगोरा पिठत, टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम''अशा जयघोषात बुधवारी (ता.१८) सकाळी पादुकांचे नीरास्नान उरकून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने जिल्ह्यातील अकलूज शहरात प्रवेश केला. त्यानंतर सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणावर भव्य असे तिसरे गोल रिंगण रंगले. अश्‍वांची नेत्रदीपक घाोडदौड आणि तुळस वृंदावन डोक्‍यावर घेऊन महिलांनी केलेला धावा, हे दृश्‍य जणू डोळे दीपणारे ठरले.

पुणे जिल्ह्यातील शेवटचे गाव असलेल्या सराटी (ता. इंदापूर) येथील नीरा नदीच्या तीरावर पालखी सोहळ्याचा मंगळवारी मुक्काम झाला. पंढरी समीप आल्याने भल्या पहाटेच जिल्ह्यातील आगमनासाठी वारकऱ्यांमध्ये उत्साह दिसत होता. पहाटे तीन वाजल्यापासूनच भाविकांनी नीरा नदीच्या वाळवंटात स्नानासाठी गर्दी केली होती. सकाळी साडेसहाच्या सुमारास पालखीतील पादुका नीरा नदीपात्रात नेण्यात आल्या. पादुकांना नीरा स्नान घालण्यात आले. सकाळी आठ वाजता सराटीतील भाविकांचा निरोप घेऊन सोहळा अकलूजकडे निघाला. नीरा नदीवरील पूल ओलांडल्यानंतर सोहळ्याने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. त्या वेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोहळ्याचे स्वागत केले. त्यानंतर अकलूजच्या गांधी चौकातून ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत स्वीकारत सोहळा पुढे सरकला. भक्तिचा आगळा प्रवाह या रस्त्यावर वाहत होता. ज्ञानोबा-तुकारामच्या भजनाने अवघा आसमंत भारुन गेला होता.

भव्य गोल रिंगणाने डोळे दीपले
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील भव्य असे गोल रिंगण सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात झाले. त्यासाठी सकाळपासूनच प्रांगणात गर्दी झाली होती. सोहळा पोचल्यानंतर ‘ज्ञानोबा- तुकाराम''चा जयघोष सुरू झाला. झेंडेकरी, टाळकरी, पखवाज वादक, तुळस वृंदावन व कळस घेतलेल्या महिलांच्या स्वतंत्र ओळी लावण्यात आल्या. पखवाज व टाळांनी चांगलाच ताल धरला. सर्व दिंड्या प्रांगणात आल्या. सर्वांच्या नजरा रिंगणावर खिळल्या. ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल' जयजयकार झाला आणि तुळस वृंदावन व कळस घेतलेल्या महिलांनी रिंगणात धावून प्रदक्षिणा पूर्ण केली. त्या पाठोपाठ विणेकरी, टाळकरी, पखवाज वादक धावले. मानाच्या अश्‍वाने प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर स्वाराच्या अश्‍वाने दोन प्रदक्षिणा घातल्या. हजारो भाविकांनी डोळे दीपवणारा हा सोहळा साठवून ठेवला.

 


इतर ताज्या घडामोडी
पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाणे राखून...वाशीम : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अवेळी पाऊस...
कांदा बियाण्याचे दर कडाडलेसातारा ः कांद्याचे दर आठ हजारापर्यंत पोचले आहे....
नगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरणनगर : आठ दिवसांपूर्वी वाढ झालेल्या कांद्याच्या...
हळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ...दापोली, जि. रत्नागिरी ः कोकणातील हवामान हळद...
केळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीतनांदेड : चांगल्या पावसामुळे यंदा खरीप हंगाम बहरला...
शाहू कृषी महाविद्यालयाच्या...कोल्हापूर : सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी...
खर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः...औरंगाबाद : महाआघाडी सरकारने राज्यातील अतिवृष्टी,...
परभणी कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे...परभणी ः राज्यातील सर्व कृषी विद्यापीठातील अधिकारी...
पीक नुकसानप्रश्नी शेतकरी संघर्ष समितीचा...परभणी ः परतीच्या मॉन्सून पावसामुळे, धरणातील पाणी...
हापूस विक्री, निर्यातीला प्रोत्साहनपर...रत्नागिरी ः कोकणच्या हापूसला भौगोलिक मानांकन (...
तुरीवरील शेंग पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक...तुरीवरील शेंग पोखरणाऱ्या अळीची अन्य पर्यायी नावे...
सांगलीत गूळ सरासरी ३६३३ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २७)...
गिरणा, हतनूरमधून मिळणार रब्बीसाठी...जळगाव ः जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गिरणा...
खानदेशात कांदा लागवडीवर परिणाम होणारजळगाव ः खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामातील...
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
महाबीजच्या सौर ऊर्जाचलित गोदामाचे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाद्वारे...
बॅलन्सशीट डोळ्यांसमोर ठेवून दिवाळी...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव कारखाना प्रशासनाने...
कृषी अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये ः...अमरावती : मोर्शी तालुक्‍यात जून ते ऑगस्ट या...
नांदेडमधील शेतकऱ्यांचा अतिवृष्टीने...नांदेड : जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात...
नगरमध्ये कापसाची व्यापाऱ्यांकडून अल्प...नगर ः कापसाला पाच हजार आठशे पन्नास रुपयांचा हमीदर...