agriculture news in marathi, sant tukaram maharaj palkhi sohola, pune, maharashtra | Agrowon

संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आज प्रस्थान
टीम अॅग्रोवन
सोमवार, 24 जून 2019

देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी (ता.२४) दुपारी अडीच वाजता देहूतील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. 

राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी रविवारी देहूत दाखल झाले आहेत. त्यामुळे देऊळवाडा आणि इंद्रायणी नदीकाठ भाविकांनी फुलून गेला आहे. ग्रामस्थांनी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी विविध ठिकाणी स्वागत कमानी उभारल्या असून, देहूनगरीत भाविकांना अन्नदानासाठी मंडपही उभारले गेले आहेत.

देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी (ता.२४) दुपारी अडीच वाजता देहूतील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. 

राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी रविवारी देहूत दाखल झाले आहेत. त्यामुळे देऊळवाडा आणि इंद्रायणी नदीकाठ भाविकांनी फुलून गेला आहे. ग्रामस्थांनी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी विविध ठिकाणी स्वागत कमानी उभारल्या असून, देहूनगरीत भाविकांना अन्नदानासाठी मंडपही उभारले गेले आहेत.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान दुपारी अडीच वाजता मुख्य देऊळवाड्यातील भजनी मंडपातून होणार आहे. पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे, काशिनाथ महाराज मोरे यांनी सांगितले, की आषाढी वारीसाठी पालखी सोहळा गुरुवारी दुपारी अडीच वाजता प्रस्थान ठेवणार आहे. त्यापूर्वी पहाटे साडेचार वाजता काकडा होईल. त्यानंतर पाच वाजता मुख्य देऊळवाड्यातील संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुखांच्या हस्ते महापूजा होईल.

पहाटे साडेपाच वाजता पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात संस्थानच्या विश्वस्तांच्या वतीने महापूजा होईल. सकाळी दहा वाजता भजनी मंडपात पालखी प्रस्थान सोहळ्याचे काल्याचे कीर्तन होईल. सकाळी अकरा वाजता इनामदारवाड्यातून महाराजांच्या पादुका देऊळवाड्यात आणण्यात येतील. दुपारी अडीच वाजता देऊळवाड्यातील भजनी मंडपात पालखी सोहळा कार्यक्रमास प्रारंभ होईल. परंपरेनुसार वारीतील ज्येष्ठ वारकऱ्याचे हस्ते पादुकांची महापूजा होईल. प्रस्थान सोहळ्यानंतर सायंकाळी पाच वाजता मंदिर प्रदक्षिणा होऊन पालखी इनामदारवाड्यात मुक्कामी असेल. पालखी सोहळ्यातील दिंडीप्रमुख, मानकरी यांचा सत्कार संस्थानतर्फे करण्यात येणार आहे. संस्थानच्या वतीने सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. 

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...