फळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘एसएओ’कडे ‘ही’ जबाबदारी 

राज्यातील महापालिका व नगरपालिका क्षेत्रातील फळे व भाजीपाला पुरवठा विस्कळीत झाल्याने कृषी विभागाची मदत घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
agriculture department
agriculture department

पुणे : राज्यातील महापालिका व नगरपालिका क्षेत्रातील फळे व भाजीपाला पुरवठा विस्कळीत झाल्याने कृषी विभागाची मदत घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कृषी आयुक्तालयाने राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना (एसएओ) सूचना दिल्या आहेत. 

शेतमालाचे उत्पादन ही बाब कृषी खात्याशी निगडीत असून पुरवठा व विक्री व्यवस्था या बाबी पणन खात्याकडे आहेत. तथापि, कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर पुरवठा यंत्रणा विस्कळीत झाली आहे. यामुळे शासनाने कृषी विभागाला याबाबत उत्पादकांचे गट ते विक्री व्यवस्था असलेले ठिकाण यात समन्वय घडवून आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

कृषी आयुक्तालयाने राज्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. राज्याच्या शहरी व निमशहरी भागात फळे व भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या, संघ, शेतकरी गटाची माहिती संकलित करून जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्याची जबाबदारी ‘एसएओं’कडे देण्यात आली आहे. 

‘‘नगरपालिका व महापालिका भागात बाजाराची ठिकाणे व फेरीवाल्यांना शेतकरी गटांमार्फत थेट पुरवठा करायचा झाल्यास यंत्रणा तयार असावी. तसेच, हा पुरवठा खंडीत होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी,’’ असे आयुक्तालयाने अधिकाऱ्यांना सांगितले आहे. 

कुचराई केल्यास कारवाई  शेतकऱ्यांनी आणलेल्या शेतमालाची वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने देखील जिल्हा पातळीवर ‘एसएओं’नी लक्ष घालणे अपेक्षित आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. ‘‘कृषी आयुक्तांना आता रोज अहवाल पाठवून आपत्ती व्यवस्थापन काळात होत असलेल्या कामांची माहिती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन स्थितीत दिलेले कर्तव्य पार पाडावी. कुचराई केल्यास कारवाईला तयार रहा,’’ अशी तंबी देखील आयुक्तालयाने दिली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com