agriculture news in Marathi SAO has this responsibility for supply of fruit and vegetable Maharashtra | Agrowon

फळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘एसएओ’कडे ‘ही’ जबाबदारी 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 मार्च 2020

राज्यातील महापालिका व नगरपालिका क्षेत्रातील फळे व भाजीपाला पुरवठा विस्कळीत झाल्याने कृषी विभागाची मदत घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

पुणे : राज्यातील महापालिका व नगरपालिका क्षेत्रातील फळे व भाजीपाला पुरवठा विस्कळीत झाल्याने कृषी विभागाची मदत घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कृषी आयुक्तालयाने राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना (एसएओ) सूचना दिल्या आहेत. 

शेतमालाचे उत्पादन ही बाब कृषी खात्याशी निगडीत असून पुरवठा व विक्री व्यवस्था या बाबी पणन खात्याकडे आहेत. तथापि, कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर पुरवठा यंत्रणा विस्कळीत झाली आहे. यामुळे शासनाने कृषी विभागाला याबाबत उत्पादकांचे गट ते विक्री व्यवस्था असलेले ठिकाण यात समन्वय घडवून आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

कृषी आयुक्तालयाने राज्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. राज्याच्या शहरी व निमशहरी भागात फळे व भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या, संघ, शेतकरी गटाची माहिती संकलित करून जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्याची जबाबदारी ‘एसएओं’कडे देण्यात आली आहे. 

‘‘नगरपालिका व महापालिका भागात बाजाराची ठिकाणे व फेरीवाल्यांना शेतकरी गटांमार्फत थेट पुरवठा करायचा झाल्यास यंत्रणा तयार असावी. तसेच, हा पुरवठा खंडीत होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी,’’ असे आयुक्तालयाने अधिकाऱ्यांना सांगितले आहे. 

कुचराई केल्यास कारवाई 
शेतकऱ्यांनी आणलेल्या शेतमालाची वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने देखील जिल्हा पातळीवर ‘एसएओं’नी लक्ष घालणे अपेक्षित आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. ‘‘कृषी आयुक्तांना आता रोज अहवाल पाठवून आपत्ती व्यवस्थापन काळात होत असलेल्या कामांची माहिती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन स्थितीत दिलेले कर्तव्य पार पाडावी. कुचराई केल्यास कारवाईला तयार रहा,’’ अशी तंबी देखील आयुक्तालयाने दिली आहे. 
 

 
 


इतर बातम्या
पुणे बाजार समितीत तिसऱ्या दिवशीही...पुणे: कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनमध्ये बाजार...
मुंबईत मंत्रालयातील चौथ्या मजल्यावर आगमुंबई : मुंबईत मंत्रालयातील चौथ्या मजल्यावर...
राज्यात ३० टक्के दूध वापराविनापुणे: कोरोना विषाणुमुळे पसरलेल्या साथीनंतर सुरू...
औरंगाबाद : शेतकरी गटामार्फत ग्राहकांना...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
भंडाऱ्यात ‘बीटीबी’ भाजी बाजाराच्या...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूच्या विरोधातील शासनाच्या...
खानदेशात बाजार समित्यांमधील लिलाव...जळगाव ः खानदेशात कलिंगडाची शिवार खरेदी ठप्प...
नँचरल उद्योग समूह सुद्धा करणार...शिराढोण, जि. उस्मानाबाद ः अन्न व औषध प्रशासन तसेच...
नगर जिल्ह्यात पाचशे टन भाजीपाला...नगरः कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनमुळे...
जगभरात कोरोनामुळे ३० हजार मृत्यूः...जिनिव्हा: जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरुच...
अमरावतीत गरजूंना स्वयंसेवी संस्थांकडून...अमरावती  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
सांगलीत खतांची दुकाने सुरू; पोलिसांची...सांगली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणारे कृषी...
अकोल्यात पीककर्ज व्यवहारास ३१ मेपर्यंत...अकोला ः ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या...
कोल्हापूरात कृषी निविष्ठा केंद्रे दहा...कोल्हापूर : जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रे...
सोलापूर बाजार समितीतील विस्कळीतपणा कायमसोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
उपासमार होणार नाही याची काळजी घ्या ः...नांदेड ः ‘कोरोना’च्या परिस्थितीमुळे जिल्ह्यासह...
विदर्भात विजांसह पावसाची शक्यतापुणे : राज्यात सुरू असलेला पूर्वमोसमी पाऊस काहीशी...
परराज्यातील ४५० कामगारांची...सोलापूर : लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या परराज्यातील...
थेट विक्रीने सोडविला दराचा प्रश्‍नऔरंगाबाद: कोरोनामुळे शेतमाल विक्रीचा प्रश्न...
पुणे, मुंबईतील सोसायटीधारकांनी...पुणे ः शहरी भागातील हाउसिंग सोसायटी भागातील...