agriculture news in marathi, sapodilla crop affected due to heavy rain, palghar, maharashtra | Agrowon

अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यात चिकूचे मोठे नुकसान
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

मुंबई : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यातील मुख्य फळपीक असलेल्या चिकूचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे लहान-मोठी फळे व नवीन कळ्या संपूर्णपणे गळून पडल्या आहेत. शेती आणि पिकांच्या या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाने चिकू उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. अतिवृष्टीमुळे खरिपातील भात, नागली, उडीद, तूर आणि भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. 

मुंबई : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यातील मुख्य फळपीक असलेल्या चिकूचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे लहान-मोठी फळे व नवीन कळ्या संपूर्णपणे गळून पडल्या आहेत. शेती आणि पिकांच्या या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाने चिकू उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. अतिवृष्टीमुळे खरिपातील भात, नागली, उडीद, तूर आणि भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. 

पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील घोलवड, बोर्डी, वाणगाव, डहाणू हा बागायती पट्टा चिकूसाठी प्रसिद्ध आहे. डहाणू आणि तलासरी तालुक्यांत दहा हजार हेक्टर तर पालघर तालुक्यात सात हजार हेक्टर क्षेत्रात चिकूचे उत्पादन घेतले जाते. येथील गोड आणि रसाळ चिकूला देशभरातून मागणी असते. मात्र, गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका चिकू पिकाला बसला आहे.

जून महिन्यात चक्रीवादळामुळे चिकू तसेच आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत शासन दरबारी विनंती, आर्जवे करूनही त्याकडे प्रशासनाने लक्ष दिलेले नाही, याकडेही शेतकरी लक्ष वेधत आहेत. त्याचसोबत यंदा जाचक निकषामुळे चिकू उत्पादक पीक विम्याच्या लाभापासूनही वंचित राहण्याची चिन्हे आहेत. यावर्षी चिकूला ९० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता आणि २० मिलिमीटर पाऊस असे दुहेरी ट्रिगर ठेवल्याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची भीती व्यक्त होते.

विक्रमगड, वाडा तालुक्यांतही शेतीचे मोठे नुकसान
विक्रमगड तालुक्यात सततच्या पावसामुळे शेतात पाणी भरल्याने भाताची रोपे पाण्यात बुडाली आहेत. त्यामुळे भातशेतीला धोका निर्माण होऊन भातपिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. विक्रमगड तालुक्यासह खुडेद, ओंदे, शील, झडपोली, केव, म्हसरोली, सजन आदी भागांतील शेतीचे बांध पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने शेतीसह वाहून गेले आहेत. तर काहींच्या शेतात माती आल्याने भात पिके गाडली आहेत. अनेकांची भातशेती पाण्याखाली तसेच जास्त पावसामुळे लागवडीखालील भातरोपे कुजण्याची शक्यता असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

मुसळधार पाऊस तसेच वादळी वाऱ्याने झोडपून काढल्याने वाडा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी आणि भात उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. त्यासोबतच भागात केळी, आले, बटाटा, कांदा, कोबी, फ्लॉवर, ऊस, हळद, टोमॅटो आदी पिके घेतली जातात.

`चिकू पुनरुज्जीवन योजना सुरू करा`
विम्याचे निकष ठरवताना चिकू उत्पादक शेतकऱ्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. जिल्ह्यातील चिकू संशोधन केंद्राकडून पीक पाहणीच्याबाबतीत दुर्लक्ष होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी चिकू पुनरुज्जीवन योजनाही बारगळली असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ही योजना सुरू करावी, अशीही मागणी शेतकरी करीत असल्याची माहिती राज्य चिकू उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक बारी यांनी दिली. 

इतर ताज्या घडामोडी
संत्र्याला जागतिक बाजारपेठेत पोचवण्याचे...अमरावती : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या...
बागलाण तालुक्यात शेतातून चंदनाची चोरीनाशिक  : बागलाण तालुक्यातील नवे निरपूर येथील...
तोलाई परिपत्रक होणार रद्द पुणे ः बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या...
‘शेतकरी सन्मान’साठी २० हजार कोटी दिले...नाशिक : शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देत त्यांना मदत...
‘मी शेतकरी’ आंदोलनाला गांधी जयंतीपासून...नगर : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव तसेच...
शेतीपूरक व्यवसायांना राज्य शासनाची...सांगली ः अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास...
थकीत बिलासाठी मुंबईत दुग्धविकास आयुक्त...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्ध...
आर्थिक मंदीमुळे देशातील शेती क्षेत्राला...नांदेड ः सध्या प्रचंड मंदी आहे. गुंतवणूक केली जात...
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...सातारा ः माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यांना...
विषबाधेच्या चौकशीची फाइल अडली गृह...नागपूर: प्रशासन गतिमान असल्याचा दावा सरकारकडून...
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
राज्यात लिंबांना प्रतिक्विंटल १५०० ते...सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३...नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा,...
मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरीऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये...
महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची...कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण...बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा...
कृषी संजीवनी प्रकल्पात पाच हेक्टरपर्यंत...मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात...