Agriculture news in Marathi Sarpanch will lead to stop Corona in washim | Agrowon

वाशीममध्ये कोरोना रोखण्यासाठी सरपंच करणार नेतृत्व

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 मार्च 2021

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व गावांमध्ये सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत.

वाशीम : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व गावांमध्ये सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत. या समितीमध्ये ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांचा समावेश असून, त्यांच्यासह सर्व आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून, याचाच एक भाग म्हणून गावस्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, गावात राहणारे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश असून, पोलिस पाटील हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.

अत्यावश्यक कामाशिवाय गावातून कोणीही बाहेर पडू नये, असे आवाहन करणे, गृह विलगीकरण करण्यात आलेला रुग्ण बाहेर फिरत असल्याचे आढळून आल्यास अशा व्यक्तींची नावे तहसील कार्यालयास सादर करणे, एकाच ठिकाणी ५ पेक्षा अधिक व्यक्ती जमणार नाहीत याची दक्षता घेणे, विशेषतः लग्न समारंभ व इतर गर्दीचे कार्यक्रमावर नियंत्रण ठेवणे, वेळोवेळी दिलेल्या वेळेतच आस्थापना, दुकाने सुरू राहू शकतील वेळेआधी किंवा वेळेनंतर आस्थापना, दुकाने सुरू राहणार नाहीत, याची खात्री करणे. सर्व आस्थापनांमध्ये कोरोनाचे नियम पाळणे आवश्‍यक आहे.

आठवडी बाजार भरल्याने ग्रामविकास अधिकारी निलंबित
कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी निर्गमित दिलेले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून इंझोरी (ता. मानोरा) येथे २५ फेब्रुवारी रोजी आठवडी बाजार भरविण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने याप्रकरणी कर्तव्यात कसूर करणाऱ्या इंझोरीच्या ग्रामविकास अधिकारी किसन वडाळ यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांनी आदेश काढले. कोरोना विषाणूचा जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील आठवडी बाजार, गुरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तरीही २५ फेब्रुवारी रोजी इंझोरी येथे आठवडी बाजार भरल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे इंझोरी येथे कार्यरत असलेले ग्राम विकास अधिकारी किसन वडाळ यांनी कर्तव्यात कसूर करून आदेशाचा भंग केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...
फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची...चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू...
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारनारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या...
सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची...जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या...
क्षेत्र वाढ, प्रक्रियेसाठी सरकारी...देशात पेरू लागवडीचे सुमारे तीन लाख हेक्टर आणि...
दुर्लक्षित पिकांनाही येत्या काळात संधीद्राक्ष, डाळिंब, आंबा, केळी, संत्रा ही राज्याच्या...
आधुनिक फुलशेती संशोधन, निर्यात...गेल्या काही वर्षांत व्यावसायिक आणि उद्योगाचा...