agriculture news in Marathi, SASCOF says, normal monsoon in south Asia, Maharashtra | Agrowon

दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून : सॅस्कॉफचा अंदाज (सविस्तर)

टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 एप्रिल 2019

पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी भागांत यंदाच्या मॉन्सूनमध्ये सर्वसामान्य पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी, तसेच उर्वरित राज्यात सरासरी इतक्या पावसाची शक्यता अधिक आहे. जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, ओडिशा, तमिळनाडूसह भारताच्या पूर्व किनारपट्टीवर सरासरीपेक्षा अधिक तर, पश्चिम किनारपट्टी, उत्तर भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याचे पूर्वानुमान ‘साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरमतर्फे (सॅस्कॉफ) व्यक्त करण्यात आला आहे.

पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी भागांत यंदाच्या मॉन्सूनमध्ये सर्वसामान्य पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी, तसेच उर्वरित राज्यात सरासरी इतक्या पावसाची शक्यता अधिक आहे. जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, ओडिशा, तमिळनाडूसह भारताच्या पूर्व किनारपट्टीवर सरासरीपेक्षा अधिक तर, पश्चिम किनारपट्टी, उत्तर भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याचे पूर्वानुमान ‘साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरमतर्फे (सॅस्कॉफ) व्यक्त करण्यात आला आहे.

गेल्या वर्षीच्या मॉन्सूनच्या पावसाचा आढावा आणि येत्या हंगामातील अंदाज व्यक्त करण्यासाठी दक्षिण आशियाई देशांच्या फोरमची चौदावी दोनदिवसीय बैठक २२ ते २३ एप्रिल या कालावधीत नेपाळच्या काठमांडू येथे झाली.

भारतासह सर्व दक्षिण आशियातील भारतासह, अफगाणिस्तान, बांगलादेश, भुतान, मालदीव, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांच्या राष्ट्रीय व विभागीय पातळीवरील हवामानविषयक संशोधन संस्थांकडून माहिती विश्‍लेषण व विचारमंथनानंतर हा अंदाज जाहीर करण्यात आला. जगभरातील हवामान स्थिती, विविध हवामान मॉडेलचा विचार करून हा अंदाज तयार करण्यात आला आहे.

प्रशांत महासागरात सध्या सौम्य ‘एल-निनो’ स्थिती आहे. माॅन्सून शेवटच्या टप्प्यात ही स्थिती कमजोर होर्इल, यावर सर्वच सहभागी शास्त्रज्ञांचे एकमत झाले. ऑक्टोबर २०१८ पासून विषुववृत्तीय प्रशांत महासागरात समुद्राच्या भुपृष्ठाचे तापमान सरासरीपेक्षा वाढले आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांच्या सुरवातीच्या काळात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान खूपच वाढले होते.

काही जागतिक मॉडेल्सच्या अभ्यासानुसार मॉन्सून हंगामादरम्यान ‘एल निनो’ स्थिती सर्वसामान्य होण्याची शक्यता आहे. मात्र ‘एलनिनो’ स्थिती नेमकी केव्हा सर्वसामान्य होईल, याबाबत अनिश्‍चितता असल्याचे या वेळी नमूद करण्यात आले. प्रशांत महासागरातील एल-निनोसह इंडियन ओशन डायपोल, युरेशियात उन्हाळा आणि हिवाळ्यातील बर्फाचे आच्छादन, जमिनीचे तापमान आदी प्रादेशिक आणि जागतिक घटकांचा माॅन्सून क्षेत्रातील पावसावर परिणाम होऊ शकतो, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले. 

बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानाचा फरक म्हणजे इंडियन ओशन डायपोल (आयओडी) स्थिती सर्वसाधारण स्थितीत आहे, तर मॉन्सूनच्या मध्यावर ही स्थिती सौम्य सकारात्मक होण्याची शक्यता आहे. साधारणत: सकारात्मक आयओडी स्थितीमुळे दक्षिण आशियात सरासरीपेक्षा अधिक, तर नकारात्मक आयओडी स्थितीत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो तसेच युरेशियात डिसेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक, जानेवारीत सरासरीइतके तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत सरासरीपेक्षा कमी होते. युरेशियातील हिवाळा व उन्हाळ्यातील बर्फाचे प्रमाण व दक्षिण आशियातील मॉन्सून यांच्यात परस्परविरोधी संबंध असतो.

कोकण, उत्तर महाराष्ट्रात कमी; उर्वरित राज्यात सरासरी इतका पाऊस
‘सॅस्काॅफ’मार्फत पावसाच्या अंदाजाविषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नकाशानुसार महाराष्ट्रातील कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता ४० टक्के आहे. तर उर्वरित राज्यात सरासरी इतक्या पावसाची शक्यता ६० टक्के आहे. कोकण, गोव्यासह कर्नाटक किनारपट्टी, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालच्या काही भाग, ईशान्य भारताचा सीमावर्ती भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता ४० ते ६० टक्के आहे. तर ओडिशा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता ५० ते ७० टक्के आहे, विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित भारतात सरासरीइतका पाऊस पडण्याची शक्यता अधिक (५० ते ७० टक्के) असल्याचे स्पष्ट होत आहे.


इतर अॅग्रो विशेष
‘कोरोना विरोधात जाणिवेसाठी रविवारी...पुणे : ‘‘कोरोना विरोधात उभारलेल्या लढ्याची...
कोरोनाच्या निदानासाठीच्या ‘मायलॅब'ला...पुणे ः देशातील कोरोनाच्या प्रत्येक रुग्णाच्या...
कांदा विक्रीसाठी ‘पणन’चे प्रयत्नपुणे: कोरोना लॉकडाऊनमध्ये शेतमालाची पुरवठा साखळी...
दूध संकलनास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई...वर्धा ः  दूध संकलनास टाळाटाळ करणाऱ्या दूध...
पालघर, डहाणू, तलासरी तालुक्यात भूकंपाचे...मुंबई: पालघर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून...
मोसंबी मागणीअभावी बागेतचऔरंगाबाद: परिपक्व झालेल्या मोसंबीच्या मृग...
लॉकडाऊनमुळे ‘निविष्टा’ कंपन्यांची उधारी...पुणे: लॉकडाऊनमुळे राज्यातील खते, बियाणे व कीडनाशक...
तीन दिवसांत एक हजार वीस टन द्राक्ष ...पुणे ः कोरोना विषाणूमुळे राज्यातील द्राक्ष...
विदर्भ, मराठवाड्यात पुर्वमोसमी पावसाचा...पुणे : राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने...
हरभरा खरेदीच्या नोंदणीसाठी मुदतवाढमुंबई: किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमी...
हापूसच्या निर्यातीसाठी युद्धपातळीवर...मुंबई: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
लॉकडाऊन संपल्यानंतर राज्यांनी गर्दी...मुंबई : लॉकडाऊन संपविल्यानंतर १५ एप्रिलला लगेच...
रासायनिक खतांचा काळाबाजार होईल; गाफील...पुणे: “देशात रासायनिक खतांचा मुबलक साठा आहे....
कोरोनाव्हायरसचा प्रसार देशभरात वेगाने;...नवी दिल्ली : कोरोनाव्हायरसचा प्रसार देशभरात...
कर्जापोटी दंडव्याज नको; केंद्राकडून...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना...
बेदाणा निर्मितीसाठी आवश्यक रसायनांची...नाशिक : कोरोना पार्श्वभूमीवर द्राक्षाच्या मागणी व...
मार्चअखेर बारा हजार कोटींची कर्जमाफी;...मुंबई : ठाकरे सरकारने जाहिर केलेल्या महात्मा फुले...
पुणे जिल्हा बॅंकेने तीन टक्के व्याजाची...पुणे : केंद्र सरकारने पीककर्ज फेडीची मुदत ३१...
मराठवाडा, विदर्भात ‘पुर्वमोसमी’चा दणका...पुणे : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
बाहेरून येणारे दुधाचे टँकर अडवण्याचे...कोल्हापूर  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...