सांगली जिल्ह्यातील सात तालुके कोरडेच

सांगली जिल्ह्यातील सात तालुके कोरडेच
सांगली जिल्ह्यातील सात तालुके कोरडेच

सांगली  : जिल्ह्यातील दहा पैकी सहा तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये आटपाडी, जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. दुसरीकडे जिल्ह्याचे चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यात सरासरीपेक्षा सुमारे दुपटीने पाऊस झाला असल्याचे दिसते आहे.

शिराळा तालुक्यात ऑगस्ट अखेरपर्यंत सरासरी ६४६.२ मि.मी इतका पाऊस होतो. मात्र, यंदा ऑगस्ट महिनाअखेरीस तब्बल १ हजार १०४.२ मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. चांदोली धरणक्षेत्र आणि पाणलोट क्षेत्रातील पावसामुळेच यंदा वारणा नदी जून पासून आत्तापर्यंत सुमारे दोन ते तीनदा पात्राबाहेर गेली आहे. दहा पैकी सहा तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्याची नोंद झाली आहे. यामध्ये आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, खानापूर, तासागव आणि वाळवा तालुक्याचा समावेश आहे. केवळ शिराळा, मिरज, पलूस, कडेगाव या तालुक्यांमध्येच सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

आटपाडी तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला असल्याची नोंद झाली आहे. आटपाडी तालुक्यात १४९.१ मि.मी सरासरी पाऊस ऑगस्ट अखेर होणे अपेक्षित होते. मात्र त्या ठिकाणी आत्तापर्यंत केवळ ५३.७० मि.मी इतकाच पाऊस झाला आहे. गतवर्षीची तुलना केल्यास गतवर्षी आटपाडी तालुक्यात २११.४ मि.मी पावसाची नोंद झाली होती, त्या तुलनेत यंदा तब्बल १५७ मि.मी पावसाची घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. जत तालुक्यातही आतापर्यंत सरसारी २०८.४ मि.मी पाऊस होणे अपेक्षित होते, तेथे १२३.९० मि.मी इतकाच पाऊस होऊ शकला आहे. गतवर्षीच्या तुलनेत देखील १९०.९ मि.मी वरून १२३.९० मि.मी इतका पाऊस पडल्याने ६७ मि.मीची घट आहे. तर कवठेमहांकाळ तालुक्यात सरासरी १९८.१ मि.मी अपेक्षित असताना, १४८.६० मि.मी इतका पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही ५५.६ मि.मीची घट आहे.

गावनिहाय पर्जन्यमापक कधी? सध्या पाऊस मोजण्याच्या पद्धतीमध्ये सर्कलनिहाय पाऊस मोजण्यात येतो. सध्या वातावरणामध्ये इतके बदल आहेत, की प्रत्येक गावामध्ये पाऊस पडण्याचे प्रमाण वेगवगळे आहे. सर्कलनिहाय बसविण्यात आलेल्या पर्जन्यमापकामुळे अनेक गावांना शासकीय लाभापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे गावनिहाय पर्जन्यमापक कधी बसविणार अशी विचारणा होऊ लागली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com