सातारा जिल्ह्यात सोयाबीनची ५८ हजार हेक्टरवर पेरणी

सोयाबीनची जिल्ह्यात ५८ हजार हेक्टरवर पेरणी
सोयाबीनची जिल्ह्यात ५८ हजार हेक्टरवर पेरणी

सातारा ः दमदार पावसाच्या आगमानामुळे जिल्ह्यात पेरणीचे क्षेत्र वाढले आहे. खरिपात शेतकऱ्यांकडून सर्वाधिक सोयाबीन पीक घेण्याकडे कल असल्याचे आकडेवारी स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात सोयाबीनची ५८ हजार ९७ हेक्टरवर लागवड झाली आहे. जिल्ह्यात खरिपातील एकूण बुधवार अखेर दोन लाख ७३ हजार २६७ हेक्टर म्हणजेच ७७.६२ टक्के पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. 

माॅन्सूनच्या उशीरा आगमनामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामाची सुरवात अडकळत झाली. त्यानंतर पावसाचे आगमन झाल्यावर पेरणीच्या कामांना गती आली. मागील चार ते पाच दिवसांपासून दमदार पाऊस सुरू असल्याने अनेक पिकांना फायदेशीर ठरला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी तीन लाख ५२ हजार ७६ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. यापैकी बुधवारअखेर दोन लाख ७३ हजार २६७ हेक्टर पेरणीची कामे उरकली आहे. टक्केवारीचा विचार करता ७७.६२ टक्के पेरणी झाली आहे. 

जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांकडून सोयाबीन पिकाकडे कल असलेल्याचा दिसून येत आहे. सोयाबीनचे ५३ हजार ७५० सर्वसाधारण क्षेत्र असून सध्या सोयाबीनची ५८ हजार ९७ हेक्टरवर म्हणजेच १०८.०९ टक्के लागवड झाली आहे. त्यानंतर बाजरीची सर्वाधिक लागवड झाली आहे. बाजरीचे ४९ हजार ५३१ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी ५१ हजार ५१ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच १०३.०७ टक्के पेरणी झाली आहे. भाताचे ५० हजार ८०५ हेक्टर क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्र असून ३९ हजार ८२० हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. 

भुईमूग शेंगेचे ४० हजार ४३० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी ३२ हजार ७६३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ज्वारीचे २६ हजार ९४५ हेक्टर क्षेत्र सर्वसाधारण असून यापैकी १७ हजार २३ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. 

तालुकानिहाय पेरणीचे क्षेत्र हेक्टरमध्ये  सातारा-२९,२६४, जावली- १९,३०२, पाटण- ५६,८५९, करा़ड- ३५,६३५, कोरेगाव- २२,५५७, खटाव- ४३,७४६, माण- २२,८३२, फलटण- १६,९०४, खंडाळा- ९,४३५, वाई-१२,९७९, महाबळेश्वर- ३९३६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com