agriculture news in marathi, In Satara district, 1163 farmers have completed their farming | Agrowon

सातारा जिल्ह्यात ११६३ शेततळी पूर्ण

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

सातारा ः मागेल त्याला शेततळे योजनेस सातारा जिल्ह्यात ११६३ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच ६० शेततळ्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. सध्या सुरू असलेला पाऊस शेततळी भरण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

राज्य शासनाने फेब्रुवारी २०१६ मध्ये मागेल त्याला शेततळे ही योजना जाहीर केली आहे. दोन हजार शेततळ्यांच्या उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे ४५३४ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये ३२६५ अर्ज पात्र; तर ११८९ अर्ज अपात्र ठरले असून, ८१ अर्जांच्या छाननीचे काम सुरू आहे. पात्र अर्जापैकी २७४६ अर्जांना मंजुरी देण्यात आली. २४४२ शेततळ्यांची आखणी करून दिली आहे.

सातारा ः मागेल त्याला शेततळे योजनेस सातारा जिल्ह्यात ११६३ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच ६० शेततळ्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. सध्या सुरू असलेला पाऊस शेततळी भरण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

राज्य शासनाने फेब्रुवारी २०१६ मध्ये मागेल त्याला शेततळे ही योजना जाहीर केली आहे. दोन हजार शेततळ्यांच्या उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे ४५३४ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये ३२६५ अर्ज पात्र; तर ११८९ अर्ज अपात्र ठरले असून, ८१ अर्जांच्या छाननीचे काम सुरू आहे. पात्र अर्जापैकी २७४६ अर्जांना मंजुरी देण्यात आली. २४४२ शेततळ्यांची आखणी करून दिली आहे.

सध्या ६० शेततळ्यांचे काम सुरू असून, ११६३ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना या योजनेत लाभ घेता येत आहे. शाश्वत पाणीसाठ्यासाठी ही फायदेशीर असल्याने जास्ती जास्त शेतकरी कसे सहभागी होतील यासाठी कृषी विभागाकडून पसार आणि प्रचार करणे आवश्यक आहे. पाऊस सुरू असल्याने शेततळ्यात पाण्याची साठवणूक सुरू झाली आहे. मात्र जास्त पावसामुळे शेततळ्याची कामेही संथ गतीने सुरू आहेत.  

१०२८ शेततळ्याचे अनुदान वितरित
जिल्ह्यात २०१६ पासून ११६३ शेततळी पुर्ण झाली आहे. यामधील १०२८ शेततळ्याचे चार कोटी ७० लाख रुपयांचे शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. उर्वरित शेततळ्याचे अनुदान निधी उपलब्ध झाल्यावर शेतकऱ्यांना दिले जाणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

तालुकानिहाय शेततळ्यांची पूर्ण झालेली कामे
सातारा- ७०, कोरेगाव १६९, खटाव १५७, माण ३००, फलटण २५२, वाई ६३, खंडाळा ७३, महाबळेश्वर ३, जावली १२, पाटण ८, कऱ्हाड ५६.

 


इतर बातम्या
नियमित कर्जदारांच्या पदरी निराशाचसांगली ः शासनाच्या कर्जमाफीच्या आदेशात अल्प...
गिरणा परिसरात कांदा लागवडीकडे कलमेहुणबारे, जि. जळगाव  ः चाळीसगाव तालुक्‍यात...
घराघरांत पोचणार नळ कनेक्‍शन, बसणार मीटर...जळगाव  : जिल्ह्यात ग्रामीण भागातील जनतेला...
जळगाव जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेतून...जळगाव : राज्यातील महाविकास आघाडी शासनाने महात्मा...
शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक कर्जमुक्तीचा...अकोला ः शेतकरी कर्जदार नसून तो भूमीचा राजा आहे....
केंद्राच्या पथकाकडून लासलगावला कांदा...नाशिक  : कांद्याचे घसरते बाजार भाव पाहता...
रयत बाजारासारखे उपक्रम राबवावे ः डॉ....अकोला  ः ‘‘शेतकरी हिताचे सर्वाधिक उपक्रम...
`रेशीम प्रकल्पाच्या मंजुरीसाठी...औरंगाबाद : राज्यातील रेशीम उद्योगाच्या एकूणच...
अमरावती येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना...अमरावती ः जिल्हा परिषदेत आठवड्यातील दोन दिवस...
आंबा बागायतदारांच्या कर्जावरील... रत्नागिरी : आंबा बागायतदारांच्या कर्जावरील...
सोलापूर, नगर जिल्ह्यांतील ‘माळढोक’चे...सोलापूर : जिल्ह्यातील नान्नज (ता. उत्तर सोलापूर)...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऊस उत्पादन घटणारसिंधुदुर्ग : जिल्ह्यात १५२० हेक्टर क्षेत्र ऊस...
शेतकरीच सरकारचा केंद्रबिंदूः उद्धव ठाकरेजळगाव : कर्जमाफी देणे, हा शेतकऱ्यांच्या...
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी विभागात १०७ पदे...सिंधुदुर्ग: जिल्हा कृषी विभागातील ३६५ पदांपैकी...
अतिवृष्टी, पूरग्रस्तांच्या कर्जमाफीसाठी...मुंबई ः राज्यात जुलै ते ऑगस्ट २०१९ या काळात...
बॅंकांच्या कृषी पतपुरवठ्यावर सरकारचे...नवी दिल्लीः बॅंकांकडून ग्रामीण भागात होणाऱ्या...
चंदनाची सात-बारा उताऱ्यावर नोंद घ्या:...नगर ः शेतकऱ्यांना शेतात चंदन लागवड करण्यास...
सातारा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी...सातारा  : राज्याच्या अर्थसंकल्पातून...
पीकपद्धतीनुसार शेतकरी उत्पादक कंपन्या...नाशिक  : आपल्या विभाग, जिल्ह्यातील...
खानदेशात कोरड्या चाऱ्याची टंचाईजळगाव  ः खानदेशात चाऱ्याची मोठी टंचाई दिसत...