सातारा जिल्हा बँकेतर्फे मुख्यमंत्री साहाय्यता निधीत १५ लाख जमा

साताराजिल्हा बँकेने सर्व संचालकांचा सभासद भत्ता, बँकेचे अधिकारी आणि सेवकांचे एक दिवसाच्या वेतनाचे एकूण १५ लाख रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधीत जमा केले आहेत.
Satara District Bank 15 Lakh deposited in Chief Minister support fund
Satara District Bank 15 Lakh deposited in Chief Minister support fund

सातारा : ‘कोरोना’मुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन केला आहे. त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. रोजंदारी कामगार, व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा बँकेने सर्व संचालकांचा सभासद भत्ता, बँकेचे अधिकारी आणि सेवकांचे एक दिवसाच्या वेतनाचे एकूण १५ लाख रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधीत जमा केले आहेत. 

बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, “जिल्हा बँक, बँकिंग कामकाजाबरोबर विकासाभिमुख कार्यात नेहमीच अग्रेसर असते. बँकेने राज्यातच नव्हे , तर देशात नैसर्गिक आपत्ती आली, त्यावेळी आर्थिक मदत केली आहे. कोरोना’वर मात करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने काळजी घ्यावी." 

बँकेचे संचालक, सहकार, पणनमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, " कोरोनाग्रस्तांसाठी बँक मदतीला धावली आहे, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.’’  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, " कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाखा सेवकांनी व ग्राहकांनी अधिकाधिक काळजी घ्यावी. हे संकट दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहावे." 

या उपक्रमाचे बँकेचे संचालक व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष सुनील माने यांच्यासह सर्व संचालक मंडळ, सभासद, ग्राहकांनी कौतुक केले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com