agriculture news in marathi, satara district bank gives two crores for drought, satara, maharashtra | Agrowon

दुष्काळ निवारणासाठी सातारा जिल्हा बॅंकेचे दोन कोटी 
टीम अॅग्रोवन
रविवार, 19 मे 2019

सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍यांबरोबरच या वर्षी पश्‍चिमेकडील अनेक तालुक्‍यांत टंचाई स्थिती तीव्र झाली आहे. टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने दोन कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यातून अकरा तालुक्‍यांतील टंचाईग्रस्त गावांना ३० जूनपर्यंत ७५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. 

सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍यांबरोबरच या वर्षी पश्‍चिमेकडील अनेक तालुक्‍यांत टंचाई स्थिती तीव्र झाली आहे. टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने दोन कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यातून अकरा तालुक्‍यांतील टंचाईग्रस्त गावांना ३० जूनपर्यंत ७५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. 

राज्यभरात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, टॅंकरच्या मागणीत वाढ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सामाजिक बांधिलकीतून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने आर्थिक मदतीचा निर्णय घेतला आहे, असे सांगून आमदार भोसले म्हणाले, की बॅंकेने टॅंकरसाठी दोन कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. या मदतीतून बॅंक अकरा तालुक्‍यांतील टंचाईग्रस्त गावांत ७५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करणार आहे. तसेच टंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना शाश्‍वत पर्याय उपलब्ध होण्यासाठी सामूहिक शेततळी उभारणाऱ्या गावांना आर्थिक मदतीचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. 

या टॅंकर वाटपाचा प्रारंभ शनिवारी बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते जिल्हा बॅंकेच्या मुख्य कार्यालयासमोर झाला. या वेळी बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील माने, संचालक प्रकाश बडेकर, कांचन साळुंखे, सुरेखा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक आर. एस. गाढवे, एम. व्ही. जाधव, व्यवस्थापक सुजित शेख, श्‍यामराव गायकवाड आदी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलाच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ...मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या...
शेतकऱ्यांना अनुदानावर सेफ्टी किटचा...यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका...इंग्लंडमध्ये लाळ्या खुरकुत (एफएमडी), बोव्हाईन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन डोंगर...सिंधुदुर्ग : अतिवृष्टीने खचलेल्या डोंगरांपैकी...
कॉंग्रेसच्या आजपासून ‘महापर्दाफाश' सभा...मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि...
जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी...मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत ...
ड्रायझोनमधील वरुडला ठिबक अनुदानातून...अमरावती  ः सर्वाधिक संत्रा लागवड व...
जलसमस्येवरील उपायांच्या प्रयत्नात...औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यात निर्माण होणाऱ्या...
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...