सातारा जिल्हा बँक पीक कर्जवाटप उद्दिष्टपूर्तीत आघाडीवर

सातारा जिल्हा बँक पीक कर्जवाटप उद्दिष्टपूर्तीत आघाडीवर
सातारा जिल्हा बँक पीक कर्जवाटप उद्दिष्टपूर्तीत आघाडीवर

सातारा : जिल्ह्यात पुन्हा एखादा राष्ट्रीयीकृत बँकानी पीक कर्जवाटपात निराशाजनक कामगिरी केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. अशा वेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली आहे. या  बँकेस १००० कोटी रुपयांचे वाटपाचे उद्दिष्ट आहे. तरीही या बँकेने १०४८ कोटी २६ लाख रुपयांचे म्हणजे १०५ टक्के कर्जवाटप केले.

खरीप हंगामासाठी १९२० कोटी रुपये पीक कर्जाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी १० जुलैअखेर ११७६ कोटी ९१ लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या ६१ टक्के वाटप करण्यात आले.

जिल्ह्यात पूर्व भागात पावसाने दडी मारली. त्यामुळे दुष्काळाचे संकट वाढले आहे. शेतकरी अ़डचणीत सापडला आहे. कर्जवाटपात जिल्हा मध्यवर्ती बॅंक आघाडीवर आहे. या बॅँकेने उद्दिष्टापेक्षा जास्त कर्जाचे वितरण केले. या बॅंकेने एक हजार कोटींच्या उद्दिष्टापैकी १०४८ कोटीं वाटप केले. ६२ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले. 

राष्ट्रीयीकृत बॅंकाकडून सातत्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. २१ राष्ट्रीयीकृत बॅंकाना ७११ कोटी ६० लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र या बॅंकाकडून १० जुलैअखेर १०४ कोटी ३६ लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले. दहा खासगी बॅंकांनी २०५ कोटी ७० लाखांच्या उद्दिष्टापैकी २४ कोटी रुपयांचे म्हणजेच अवघे १२ टक्के वितरण केले. 

राष्ट्रीयीकृत बँकांची उदासीनता 

राष्ट्रीयीकृत बँकाकडून कर्ज वितरणाकडे दुर्लक्ष होत आहे. साडेतीन महिन्यांत राष्ट्रीयीकृत बँकांकडून अवघे १५ टक्के पीक कर्जवाटप झाले आहे. राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी कर्ज वितरणात उदासीनता दाखवली आहे. बॅंकनिहाय हेच आकडे पाहता कर्जवाटपाची टक्केवारी कमी होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com