agriculture news in marathi, satara District in dam over flow | Agrowon

सातारा जिल्ह्यातील सहा धरणांतून विसर्ग कायम
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

सातारा ः जिल्ह्यातील कोयना, धोम, उरमोडी, कण्हेर, तारळी व धोम-बलकवडी या सहा प्रमुख धरणांतून सलग दुसऱ्या दिवशी धरणातून विसर्ग कायम ठेवण्यात आला. कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने विसर्गात वाढ करण्यात आली आहे.
वीजनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे बुधवारी (ता. २२) सायकांळी सात वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे पाच फुटावरून साडे सहा फुटावर उचलण्यात आले आहेत.

सातारा ः जिल्ह्यातील कोयना, धोम, उरमोडी, कण्हेर, तारळी व धोम-बलकवडी या सहा प्रमुख धरणांतून सलग दुसऱ्या दिवशी धरणातून विसर्ग कायम ठेवण्यात आला. कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने विसर्गात वाढ करण्यात आली आहे.
वीजनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे बुधवारी (ता. २२) सायकांळी सात वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे पाच फुटावरून साडे सहा फुटावर उचलण्यात आले आहेत.

या सहा दरवाज्यांतून ५५ हजार २७७ व पायथा वीज गृहातून २१०० असा एकूण ५७ हजार ३७७ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. यामुळे मुळगाव येथील पूल तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. धरण क्षेत्रातील कोयना ८०, नवजा १४१, महाबळेश्र्वर १०६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या धरणात १०२.५४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

धोम, उरमोडी, कण्हेर, तारळी व धोम-बलकवडी या पाच धरणांतून पावसाचा विसर्ग कायम असून धोम आणि उरमोडी धरणांतून पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. सध्या धोम ६,२८६, कण्हेर २,८३७, उरमोडी १,५९०, धोम-बलकवडी ३,०५४, तारळी १,८४० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात  आहे.   

पावसाचा जोर कमी झाला
जिल्ह्यात मंगळवारच्या तुलनेत बुधवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. जिल्ह्यात गुरुवारी (ता. २३) सकाळी आठपर्यंत सरासरीस १३.८३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पश्चिमेकडील महाबळेश्वर, जावली, पाटण, सातारा या तालुक्यांत काही ठिकाणी पावसाच्या दमदार सरी झाल्या आहेत. कराड, वाई, खंडाळा, कोरेगाव, खटाव या तालुक्यांत तुरळक पाऊस झाला आहे. माण, फलटण या दुष्काळी तालुक्यांत पावसाची दडी कायम आहे. पश्चिमेकडील तालुक्यात संततधार पावसामुळे पिकांत मोठ्या प्रमाणात तण आले आहे. मात्र, दुष्काळी तालुक्यात पावसाअभावी पिके धोक्यात येऊ लागली आहेत.  

इतर बातम्या
संत नामदेव महाराजांच्या १७ व्या...पंढरपूर : पंढरपूर येथून आळंदीकडे निघालेल्या श्री...
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
शिशुआहारातील शर्करेविषयी अधिक काळजी...माणसाच्या आरोग्याला हानिकारक खाद्यविषयक सवयी...
वऱ्हाडात जमिनीतील ओलीमुळे रब्बीची पेरणी...अकोला : मॉन्सूनोत्तर पावसाने मोठा...
'गडचिरोली जिल्ह्यात शासकीय धान खरेदी...गडचिरोली  ः आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने...
खानदेशात प्रकल्पांमधील साठा ७८ टक्‍क्‍...जळगाव  ः खानदेशात सर्वच भागांतील...
भामरागड तालुक्‍यातील पूरग्रस्त...गडचिरोली  ः उपविभागीय अधिकारी कार्यालय...
कापूस खरेदीसाठी आर्द्रतेची मर्यादा...वर्धा  ः संततधार पावसामुळे या वर्षी कापसात...
'शासकीय धान केंद्रावर जाचक अटींचे...भंडारा  ः शासकीय धान खरेदी केंद्रावर पाखड...
अमरावती विभागात विषबाधितांची संख्या...अमरावती ः राज्यात दोन वर्षांपूर्वी फवारणीदरम्यान...
देवळाली कॅम्प येथून ४८ हजार रुपयांच्या...नाशिक : नाशिक तालुक्यातील देवळाली कॅम्प येथील...
मराठवाड्यात मजूर मिळेना, वेचणीचे दर...औरंगाबाद : जोरदार पावसाने केलेल्या नुकसानीतून...
डाळिंब बागा वाचविण्यासाठी धडपडआटपाडी, जि. सांगली :  यंदा तालुक्यात रिमझिम...
सांगली जिल्ह्यात रब्बीतील पिकांची ६७...सांगली : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख क्विंटल...पुणे  ः यंदा पाऊस उशिरा झाल्याने पुणे...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीवर अमेरिकन...परभणी : जिल्ह्यातील पेडगाव (ता. परभणी) येथील दोन...
सोलापूर जिल्ह्यात रब्बीची उरकली ३१...सोलापूर : खरिपामध्ये पावसाने हुलकावणी दिली. पण,...
सातारा जिल्ह्यात आले पिकावर ‘करपा’चा...सातारा  ः अतिपावसाचा फटका इतर पिकांप्रमाणे...
पावसामुळे स्ट्रॉबेरीचा हंगाम लांबणीवरपुणे : मॉन्सूनचा लांबलेला मुक्काम आणि...