सातारा जिल्ह्यात कडकडीत बंद
सातारा जिल्ह्यात कडकडीत बंद

सातारा जिल्ह्यात कडकडीत बंद

सातारा ः मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसह रस्त्यावर उतरलेल्या मराठ्यांनी गुरुवारी (ता. ९) पुन्हा एकदा क्रांती घडविली. महाराष्ट्र बंदमध्ये जिल्ह्यावासीय उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातही कडकडीत बंद राहिला. जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको, कोणी मुंडण केले, जनावरे रस्त्यावर बांधली, पोवाडे, देशभक्तिपर गीत म्हणाले, तर कोणी ठिय्या मारला. शासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्‍त करत तळपत्या मराठ्यांनी आणखी एकदा समाजाची एकजुटीतील ताकद सिद्ध केली.

मराठा समाजाने संयमाची भूमिका घेतली असली तरी आजचा बंद म्हणजे मराठ्यांचा सुप्त उद्रेकच ठरला. नेतृत्वाशिवाय मराठा ताकदवान आहे, ही चुणूक दाखविणारा संप यशस्वी करून सुप्त उद्रेक दाखवून दिला. त्यातही पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर नाका (कऱ्हाड) येथे तसेच तासवडे (ता. कऱ्हाड) टोल नाक्‍यावर मराठा आंदोलकांनी भजन कीर्तन करत काही काळ महामार्ग रोखून धरला. कऱ्हाड-पंढरपूर रस्त्यावर सदाशिवनगर (ता. कऱ्हाड) येथे रास्ता रोको केला.

केळघर (ता. जावळी), नरवणे (ता. माण) येथे टायर पेटवून शासनाचा निषेध नोंदविला. वडूजमध्ये (ता. खटाव) कडकडीत बंद पाळून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अव्याहतपणे सुरू असलेल्या जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांनी महाराष्ट्र बंदमुळे `विश्रांती'' घेतली. सातारा, कऱ्हाड, फलटण, वाई या शहरांसह जिल्ह्यातील इतर शहरे, एव्हाना गावोगावीच्या बाजारपेठाही बंद राहिल्या. जिल्ह्याची बाजारपेठ असलेल्या साताऱ्यात कडकडीत बंद होता. पर्यटनस्थळ असलेल्या पाचगणी येथेही बंद पाळण्यात आल्याने पर्यटनस्थळावर शुकशुकाट पसरला. रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथे आठवडा बाजार असूनही कडकडीत बंद पाळण्यात आला.

राज्यभरासह सातारा जिल्ह्यात सकाळपासून सायंकाळपर्यंत एकही बस धावली नाही. त्यामुळे नेहमी आंदोलनाची शिकार होणारी एसटी दुपारपर्यंत सुखरूप राहिल्या. कऱ्हाड येथील प्रीतिसंगमावर आंदोलकांनी सामूदायिक मुंडण केले. जावळीतील हजारो मराठ्यांनी मेढ्यात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com