सातारा जिल्ह्यात अवघे ३२ टक्के कर्जवाटप

In Satara district, only 32% loan is allocated
In Satara district, only 32% loan is allocated

सातारा ः जिल्ह्यातील कर्जमाफीत अडकलेल्या बँकांकडून कर्ज वितरणाकडे दुलर्क्ष केल्याचे आकडेवारी स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत अवघे ३२ टक्के कर्ज वितरण झाले आहे. उर्वरित कालावधीत बँका कर्ज वितरणाबाबत शेतकऱ्यांकडे लक्ष देणार की नाही हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.  

जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ९८० कोटी रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी जानेवारीअखेर अवघे ३०९ कोटी २५ लाख रुपयांचे म्हणजेच ३२ टक्के वितरण करण्यात आले आहे. सर्वच बँका कर्जमाफी अडकल्याने कर्ज वितरणाकडे दुलर्क्ष केले जात आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांना रब्बी हंगामात ४४६ कोटी ७० लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. यापैकी राष्ट्रीयीकृत बॅंकानी ६३ कोटी १९ लाख रुपये म्हणजे उद्दिष्टाच्या १४ टक्के कर्जवाटप केले आहे. 

यामध्ये बॅंक ऑफ इंडिया या बॅंकेने सर्वाधिक २२ कोटी ७० लाखांचे म्हणजेच उद्दिष्टाच्या २३ टक्के कर्जाचे वितरण केले आहे. यानंतर खासगी बॅंकांना १३१ कोटी ९० लाख रुपयांच्या उद्दिष्टापैकी ४८ कोटी ७८ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. खासगी बॅंकांनी एकूण उद्दिष्टापैकी ३७ टक्के कर्जवाटप केले आहे. खासगी बॅंकात सर्वाधिक आयसीआयसीआय बॅंकने सर्वाधिक १८ कोटी ५९ लाखांचे म्हणजेच उद्दिष्टाच्या २५ टक्के कर्जाचे वितरण केले आहे. 

रब्बी कर्ज वितरणासाठी मार्चअखेरपर्यंत मुदत आहे. उर्वरित कालावधीत कर्जाची उद्दिष्टाच्या ५० टक्के पर्यंतही जाणे शक्य होणार नाही. प्रशासनाकडून जास्त जास्त कर्ज वितरण करावे यासाठी बैठका घेतल्या जातात.

जिल्हा बँकेकडून सर्वाधिक कर्ज वाटप जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खातेदार असल्याने या बँकेकडून सर्वाधिक कर्ज पुरवठा केला जात आहे. रब्बी हंगामात राष्ट्रीयीकृत, खासगी बँकाकडून शेतकऱ्यांकडे दुलर्क्ष केले असतानाही जिल्हा बँकेकडून पीक कर्जाकडे बऱ्यापैकी लक्ष दिले गेले आहे. या बॅंकेने १९७ लाख २४ लाखांचे म्हणजेच ४९ टक्के कर्ज वितरण केले आहे. तर खरिपात या बँकेने उद्दिष्टापेक्षा जास्त १०९६ कोटी ८६ लाख म्हणजेच ११० टक्के कर्ज वितरण केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com