सातारा जिल्ह्यात शिवारातील मशागातीची कामे रखडली 

कऱ्हाड, जि. सातारा ः लॉकडाऊनमुळे काही अत्यावश्यक बाबींनाच शासनाने परवानगी दिली आहे. त्यामध्ये शेतीविषयक कामांना आणि बि-बियाणे, कीटकनाशके यांची दुकाने ठरावीक वेळेत उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामध्ये शेती अवजारे, मशागतीसाठी लागणारे साहित्य, ठिबकसाठी लागणाऱ्या पाईप व अन्य साहित्यांचा समावेशच नाही. त्यामुळे कारवाईच्या भीतीने संबंधितांनी ती दुकाने बंदच ठेवली आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हंगामपूर्व कामे रखडली आहेत. सध्याच्या मोकळ्या वेळेत मशागतीची आणि शेतीतील कामे हातावेगळी करण्यासाठी शेतकरी उत्सुक आहेत. अनेकांनी ठिबकसाठीची तयारीही केली आहे. मात्र, पाईपच मिळत नसल्याने त्यांच्यापुढे मोठा प्रश्न उभा आहे.
in satara plowlight work pending due to implements

सातारा जिल्ह्यात ऊस उत्पादन शेतकरी जास्त आहेत. साखर कारखान्याला किंवा गुऱ्हाळाला ऊस गेला की शेतकरी खरीप हंगामपूर्व मशागतीच्या कामाला लागतात. एप्रिल, मे महिन्यात शेतकरी वादळी पावसाच्या अगोदर शेतीकामे मार्गी लावण्यासाठी व्यस्त असतात. दरवर्षीचे हे चित्र सध्या लॉकडाऊनमुळे बदलले आहे. ‘कोरोना’मुळे सध्या सर्वत्र संचारबंदी आणि जमावबंदी आहे. त्यामुळे सर्वांनाच घरी बसण्याचे आदेश आहेत. मात्र, सर्वांना जगवणाऱ्या जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना मात्र त्यातून सुट देण्यात आली आहे. शेतातील माल जर बाजारपेठेत आला नाही तर खायचे वांदे होतील या भीतीने त्यांना त्यांची कामे करण्यास आणि शेतमाल बाजारात आणण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

तरीही काही ठिकाणी शेतकऱ्यांना अडचणी येतच आहेत. प्रशासनाने शेतीविषयक कामांना आणि बि-बियाणे, कीटकनाशके यांची दुकाने ठरावीक वेळेत उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, त्यामध्ये शेती अवजारे, मशागतीसाठी लागणारे साहित्य, ठिबकसाठी लागणाऱ्या पाईप व अन्य साहित्यांचा समावेशच नाही. त्यामुळे दुकान उघडले तर कारवाई होईल या भीतीने संबंधित विक्रेत्यांनी ती दुकाने बंदच ठेवली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे एखादे अवजारे बिघडले, ट्रॅक्टर नादुरुस्त झाला तर काय त्याचे पार्ट मिळत नसल्याने ते बंदच ठेवायची वेळ आली आहे. त्याचबरोबर सरकार पाण्याची बचत व्हावी यासाठी शेतकऱ्यांना १०० टक्के ठिबक करा, असे सातत्याने सांगत आहे. 

लॉकडाऊनमध्ये ठिबकसाठीच्या पाईपही मिळत नाहीत. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मशागती करण्याच्याही समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे एरव्ही मशागतीच्या कामांसाठी शेतकऱ्यांनी फुलणारी शिवारे सध्या ओस पडल्याचेच दिसत आहेत. 

प्रशासनाच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे डोळे  लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांपुढे सध्या मोठे आर्थिक संकट उभे आहे. त्यातूनही सावरुन शेतकरी चारपैसे जमा करून पुढील हंगाम तरी चांगला साधेल या विचाराने शेतीपिकांसाठी शेतजमीन तयार करत आहेत. त्यासाठी त्याने तयारीही केली आहे. मात्र स्पेअरपार्ट अभावी कोणाचा ट्रॅक्टर बंद आहे. कोणाचा नांगर, रोटोव्हेटर बंद आहे. कोणाची ठिबकची कामे रखडली आहेत, अशी स्थिती आहे. त्यावर आता सातारा जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. शासनाने तातडीने निर्णय घेतल्यास शेतकऱ्यांना मशागतीची कामे उरकता येतील. 

लॉकडाऊन काळात प्रशासनाने घातलेले निर्बंध योग्यच आहेत. शेती कामांना त्यातून सुट दिली असली तरी शेती अवजारे, स्पेअरपार्ट आणि ठिबकच्या साहित्याची दुकाने बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची कामे रखडली आहेत. ती तातडीने सुरू करावी.  - रमेश देशमुख,  उपसभापती, पंचायत समिती, कऱ्हाड   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com