agriculture news in marathi 'Satara district still at risk of bird flu' | Page 2 ||| Agrowon

‘सातारा जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्लू’चा धोका नाही’

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 जानेवारी 2021

सातारा : जिल्ह्यात बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाचा अद्याप कोणताही धोका नाही. कुक्कुटपालक शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्वेक्षण केले जात आहे.

सातारा : ‘‘जिल्ह्यात बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाचा अद्याप कोणताही धोका नाही. कुक्कुटपालक शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्वेक्षण केले जात आहे. पशुसंवर्धन विभाग दक्ष राहून काम करीत आहे. जिल्ह्यात कावळे, पोपट, बगळे, वन्य पक्षी किंवा स्थलांतरित पक्षी मोठ्या प्रमाणात मृत झाल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी त्वरित पशुसंवर्धन विभागास माहिती द्यावी’’, असे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले. 

‘‘परंपरागत अन्न उकळून शिजवण्याच्या पद्धतीनुसार कोंबडीचे मास व अंडी खाणे हे पूर्णतः सुरक्षित आहे. पक्षी व अंडी विक्रीवर कोणतेही निर्बंध लागू नाहीत. त्यामुळे जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अफवा पसरवू नये. सर्व जलाशये, तलाव किंवा पाणवठ्याच्या जागी कोणताही असाधारण पक्षी मृत होण्याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,’’ असे डॉ. परिहार म्हणाले. 

डॉ. परिहार म्हणाले,‘‘‘बर्ड फ्लू’चा संभाव्य धोका ओळखून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. पक्ष्यांमधील कोणत्याही असाधारण मरतूक लपवण्यात येऊ नये, तशी सूचना संबंधित पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती, तालुका नोडल अधिकारी यांनाही देण्यात यावी. त्यामुळे प्रशासनास वेळीच योग्य ती कार्यवाही करणे सोयीचे होईल.’’ 

नोंदणी बंधनकारक

‘‘जिल्ह्यात १९ व्या पशुगणनेनुसार ३९ लाख ७९ हजार ६११ इतकी कुक्कुट पक्षी संख्या आहे. जैव सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करून पक्ष्यांच्या आरोग्याची दक्षता घ्यावी. पाच हजारांपेक्षा जास्त पक्ष्यांचे संगोपन करणाऱ्यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक आहे’’, असेही डॉ. परिहार यांनी स्पष्ट केले.


इतर बातम्या
औरंगाबादमध्ये थेट शेतमाल विक्रीची...औरंगाबाद : जिल्ह्यातील विविध शहरांसह औरंगाबाद...
मधमाशीपालन योजनेचा लाभ घ्यानांदेड : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग...
नगर जिल्हा बॅंकेची निवडणूक ठरलेल्या...नगर : मागील वर्षी म्हणजे २०२०मध्ये मुदत संपलेल्या...
शेतीमाल दरातील तेजी केंद्राच्या...नागपूर : सोयाबीनसह, कापसाला खुल्या बाजारात...
पुणे विभागात रब्बीचे चार लाख हेक्टर...पुणे ः सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसाचा...
थंडीत वाढ होण्याची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ...
तुरीला दराची झळाळीनांदेड : तूर उत्पादक पट्ट्यात नव्या तुरीची आवक...
नागुढाणामधील पक्ष्यांमध्ये बर्ड...अमरावती  : धारणी तालुक्यातील नागुढाणा या...
इथे १५ मिनिटांत सोडवला जातो प्रश्‍न !पुणे : ‘‘आयएसओ’ मानांकन मिळविणारे आणि काही...
मंगळवेढा तालुक्यात  कोंबड्यांचा मृत्यूसोलापूर : मारापूर (ता. मंगळवेढा) येथील १२...
तूर खरेदीची मर्यादा किती?सांगली : नाफेडतर्फे हमीभावाने तूर खरेदी केंद्र...
राज्यात साखरेचा महापूरपुणे : राज्यात गेल्या वर्षीची ३६ लाख टन साखर...
तंत्रज्ञान सप्ताहात शेतकऱ्यांना घातली...माळेगाव, जि. पुणे ः भरडधान्य उत्पादन,...
अद्याप ४१२ लाख टन ऊसगाळप बाकीपुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत ५३४...
बर्ड फ्लू तपासणीसाठी पुण्यात होणार...पुणे ः बर्ड फ्लूच्या संशयित नमुन्यांच्या...
रिसोडमध्ये कांदा बीजोत्पादनाकडे कल रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात यंदा कांदा...
प्रक्रिया, खाऱ्या दाण्यासाठी भुईमुगाची...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
कामे व्यवस्थित करा, अन्यथा पगारातून...पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)...
औरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची...औरंगाबाद : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार...
पुणे जिल्ह्यात संमिश्र निकाल; दावे-...पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये...