सातारा जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरणासाठी दहा कोटींची मागणी

सातारा जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरणासाठी दहा कोटींची मागणी

सातारा ः कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी राज्य शासनाकडून ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ मोहीम राबविण्यात आली. शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जास अनुदान देता यावे यासाठी कृषी विभागाने दहा कोटी निधीची मागणी करण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांना शेतीकामासाठी मजूर टंचाई भासत असल्याने तसेच पीक उत्पादनवाढीसाठी शासनाकडून यांत्रिकीकरणावर भर देण्यात आला होता. या यांत्रिकीकरणाचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले होते. या मोहिमेस जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. निधीच्या तुलनेत जास्त अर्ज आल्याने लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची नावे काढून कृषी विभागाकडून टप्प्याटप्प्याने पूर्वसंमती देण्यात आली होती.

यासाठी आठ कोटी ४८ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामधील सहा कोटी आठ लाख निधी वितरित करण्यात आला आहे. या योजनेतील एप्रिल २०१८ पासून सात हजार २५९ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. यातील काही शेतकऱ्यांनी गतवर्षीच्या निधीतून अनुदान देण्यात आले आहे. तसेच शिल्लक असलेल्या निधीतून अनुदान वितरणाचे काम सुरू आहे. अर्जाची संख्या आणि अवजाराचे प्रकार बघता जिल्ह्यासाठी अजून दहा कोटींच्या निधीची गरज असल्याने या निधीची मागणी करण्यात आली आहे. हा निधी प्राप्त झाल्यास सर्व अर्जदारांना अनुदान देता येणार आहे.

ट्रॅक्टरला सर्वाधिक मागणी यांत्रिकीकरण योजनेत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरला सर्वाधिक पसंती दिल्याचे अर्जाच्या संख्येवरून दिसून येत आहे. प्राप्त झालेल्या एकूण अर्जापैकी ३२४६ अर्ज एकट्या ट्रॅक्टरसाठी तर ४०१३ अर्ज इतर सर्व औजारांसाठी प्राप्त झाले आहे.

तालुकानिहाय अर्जाची संख्या  सातारा-४९७, कोरेगाव-६१९, खटाव-१२७१, कराड-१२९०, पाटण-३४५, जावळी १३९, खंडाळा-२७०, वाई-३६६, महाबळेश्वर-५६, फलटण-१२९०, माण-१११६.

जिल्ह्यात या योजनेसाठी शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले आहेत. या सर्व अर्जांना अनुदान देता यावे, यासाठी दहा कोटीची मागणी करण्यात आली आहे. - विजय राऊत, कृषी उपसंचालक, सातारा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com