सातारा जिल्ह्यात छावण्यांची अद्यापही प्रतीक्षाच

सातारा जिल्ह्यात छावण्यांची अद्यापही प्रतीक्षाच
सातारा जिल्ह्यात छावण्यांची अद्यापही प्रतीक्षाच

सातारा : दुष्काळाच्या झळा वाढलेल्या असताना प्रशासन निवडणुकीच्या रणधुमाळीत अडकले असल्याने चारा छावण्या सुरू करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे. जिल्ह्यात सध्या म्हसवडमध्येच माणदेशी फैउंडेशन चारा छावणी सुरू असून, इतरत्र ५० छावण्यांसाठी विविध सोसायटी, बॅंका, संस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविले आहेत.  यंदाचा दुष्काळ जिल्ह्यातील पशुधनाच्या जिवावर बेतणारा ठरत आहे. दुष्काळाची दाहकता वाढत असून, चाराटंचाईही भासू लागली आहे. शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा विकत घ्यावा लागत आहे. सध्या साखर कारखाने सुरू असल्याने उसाचे वाढे मिळत आहे. मात्र, कारखान्यांचा हंगाम संपला तर ते वाढे मिळणेही दुरापास्त होणार आहे. माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा, फटलटण, वाई तालुक्‍यांतील जनावरे दुष्काळ बाधित झाली असून, ही संख्या तब्बल ४९ हजार ४५६ इतकी असल्याची प्रशासनाकडे नोंद आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने चारा टंचाई तीव्र होत आहे. जनावरांसाठी चारा मिळविण्यात शेतकऱ्यांची कसरत होऊ लागली आहे. ती दूर करण्यासाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकरी करू लागले आहे. माण तालुक्‍यातून तब्बल ४७, तर खटाव तालुक्‍यातून तीन चारा छावण्या सुरू करण्यासाठी विविध विकास सेवा सोसायट्या, बॅंका, धर्मादाय कार्यालयांमार्फत नोंदणीकृत सामाजिक संस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. त्या प्रस्तावांची तपासणी सुरू असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागातून देण्यात आली.  चाऱ्यांचे दर कडाडले  उसाचा हंगाम संपत आला असल्याने चाऱ्याची समस्या भीषण होत आहे. त्यामध्ये सध्या कडब्याचे दर कडाडले असल्याने जनावरे जगविणे शेतकऱ्यांना जिकिरीचे ठरत आहेत. दोन ते अडीच हजार रुपये शेकडा याप्रमाणे कडबा पेंडीसाठी पैसे मोजावे लागत आहेत.  चारा, पाण्यावाचून जनावरांचे हाल होत आहेत. दुष्काळग्रस्त भागातील जनावरे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. प्रशासनाने वेळेत निर्णय घेऊन चारा छावण्या सुरू कराव्यात. - बाबासाहेब वीरकर, बिजवडी (ता. माण) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com