सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपले

साताराः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड, सातारा व पाटण तालुक्यातील अनेक गावांना शुक्रवारी (ता. २३) पावसाने झोडपून काढले.
 Satara district was again lashed by rains
Satara district was again lashed by rains

सातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड, सातारा व पाटण तालुक्यातील अनेक गावांना शुक्रवारी (ता. २३) पावसाने झोडपून काढले. विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतीसह सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. जिल्ह्यात २४ तासांत सरासरी ९.७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासून उष्णतेत वाढ झाली होती. चार वाजण्याच्या सुमारास पावसाने विजेच्या कडकडासह सुरवात केली. सुमारे एक ते दीड तास मुसळधार पाऊस झाला. दुष्काळी माण, खटाव, कऱ्हाड, सातारा या तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. इतर तालुक्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. 

परतीच्या पावसाने सोयाबीन, भुईमूग, भात, ज्वारी, मका, फळबागा यासह उसाचे अतोनात नुकसान झाले. ऊस भुईसपाट झाला आहे. दसऱ्याच्या सणासाठी येणाऱ्या झेंडूच्या फुलांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोना संकट, परतीचा पाऊस, यामुळे ऊसतोडणी लांबणीवर जाणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

या पावसामुळे ऊस गाळपाचे वेळापत्रक कोलमडणार आहे. हंगाम सुरू होण्यास विलंब होणार आहे. या पावसामुळे खरीप हंगाम हातचा जाण्याबरोबर रब्बी हंगामही लांबत आहे.

तालुकानिहाय पाऊस(मि.मी) ः

सातारा १२.९२, जावली ८.७०, पाटण २.९१, कराड २१.३१, कोरेगाव ८.४७, खटाव ११.७८, माण २५.२९, फलटण १.११, खंडाळा ०.३०, वाई ००, महाबळेश्वर ०.१३.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com