agriculture news in marathi Satara district was lashed by rains | Agrowon

सातारा जिल्ह्याला पावसाने झोडपले

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

सातारा ः दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर सोमवारी (ता. १९) पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. सातारा, वाई, कऱ्हाड, कोरेगाव तालुक्यातील काही गावांना पावसाने झोडपून काढले.

सातारा ः दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर सोमवारी (ता. १९) पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. सातारा, वाई, कऱ्हाड, कोरेगाव तालुक्यातील काही गावांना पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. जिल्ह्यात २४ तासांत ८.८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

परतीच्या पावसामुळे अगोदर नुकसान झाले असतानाच सोमवारी पावसाने पुन्हा दणका दिला. दोन दिवस विश्रांती दिल्यामुळे खरीप पिकांची काढणी सुरू करण्यात आली. मात्र, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पावसाने अचानक हजेरी लावली. सातारा, वाई, कऱ्हाड, कोरेगाव तालुक्यातील काही गावात मुसळधार पाऊस झाला. कमी कालावधीत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतात पाणीच पाणी झाले.

शेतात केलेली बांधबंदिस्ती वाहून गेली आहे. या पावसाचा भात, ज्वारी, भुईमूग, आले, स्ट्रॅाबेरी तसेच रब्बी हंगामातील पेरणी झालेल्या पिकांच्या रानात पाणी साचले. त्यामुळे उगवणीवरही परिणाम होणार आहे. दुष्काळी माण, फलटण, खटाव, खंडाळा तसेच महाबळेश्वर तालुक्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मंगळवारी पावसाची उघडीप होती.

अधूनमधून ढगाळ वातावरण होते. कोयना धरण परिसरात पावसाची उघडीप राहिली. धरणातील पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला. मंगळवारी सकाळी आठपर्यंत धरणात एकूण १०४.१७ टीएमसी पाणीसाठा झाला.

तालुकानिहाय पाऊस (मि.मी)

सातारा-१९.२३, जावळी - ७.६७, पाटण-२.०९, कऱ्हाड - १२.३८, कोरेगाव - ९.९६, खटाव - ६.४८, माण - १.४३, फलटण - ६.३३, खंडाळा - २.५०, वाई-१६.२९, महाबळेश्वर - १.००.
 


इतर ताज्या घडामोडी
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...
कोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन...कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात...
नाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढानाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा......
सिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे...
रत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची...रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे...
नांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी...
नगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची... नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,...
कोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने...कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत...
राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे...मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे...
विमा कंपनीचा कारभार चालतोय कृषी...सातारा : जिल्ह्यात खरिपाच्या सुरूवातीस पावसाने...
चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन...रत्नागिरी : ढगफुटीसदृश पावसामुळे चिपळूणकरांचे...
पाणी ओसरताच तातडीने पंचनामेकोल्हापूर : पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्य...
शेतकरी नियोजन पीक : कांदाशेतकरी : नंदकुमार काशिनाथ उशीर गाव : धोडंबे, ता...