agriculture news in marathi, Satara-Latur highway land acquisition soon | Agrowon

सातारा-लातूर महामार्गाच्या भूसंपादनाचा मोबदला लवकरच

टीम अॅग्रोवन
रविवार, 15 जुलै 2018

सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या संमतीविनाच काम सुरू केले आहे. त्यात शेतीचे नुकसान होत असल्याच्या प्रश्‍नाकडे आमदार ॲड. रामहरी रुपनवर यांनी विधान परिषदेत लक्ष वेधले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ सी साठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्याबाबतची कार्यवाही प्रगतीपथावर असल्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी त्यावर उत्तर देताना सांगितले.

सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या संमतीविनाच काम सुरू केले आहे. त्यात शेतीचे नुकसान होत असल्याच्या प्रश्‍नाकडे आमदार ॲड. रामहरी रुपनवर यांनी विधान परिषदेत लक्ष वेधले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ सी साठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्याबाबतची कार्यवाही प्रगतीपथावर असल्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी त्यावर उत्तर देताना सांगितले. त्यानंतर सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी संबंधितांसमवेत बैठक घेण्याचे निर्देश राज्यमंत्र्यांना दिले.‘ॲग्रोवन'ने गेल्या दोन-तीन दिवसांपासून हा विषय सातत्याने मांडल्यांने त्याची दखल विधिमंडळात घेतली गेली.

या महामार्गाच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ऊस, केळीसह अन्य पिके भुईसपाट केली जात आहेत. शेतकऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता, हे काम सुरू असल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. यासंबंधीचे वृत्त ‘ॲग्रोवन'ने ११ आणि १२ एप्रिल रोजी प्रसिद्ध केले होते.

या विषयावर रुपनवर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पोटे-पाटील म्हणाले, "सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ सी राष्ट्रीय महामार्ग केंद्र शासनाच्या दि. ३ जानेवारी २०१७ च्या अधिसूचनेद्वारे घोषित झालेला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्याबाबतची कार्यवाही प्रगतिपथावर आहे. सद्य:स्थितीत राज्यमार्ग क्र. १४१ ची रुंदी २४ मीटर आहे. या आणि प्रत्यक्ष असलेल्या वहिवाटीच्या रुंदीतच दोन पदरी व पेव्हर शोल्डरचे काम प्रगतीत आहे.``

‘‘भौमितिक, वळण सुधारणा, बसवे, विश्रांती थांबा, पथकर नाका आदीसाठी तेथे वहिवाटीच्या रुंदीपेक्षा जास्त रुंदीची आवश्‍यकता आहे. अशा ठिकाणी भूसंपादन करण्यात येणार असून ३ (A) ची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर रस्ता सुधारणेचे काम करण्यात येणार अाहे``, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी कळविले असल्याचेही पोटे-पाटील यांनी सांगितले.


इतर बातम्या
सांगा साहेब, खरीप कसा पेरू? शेतकऱ्याने...नाशिक : मागील खरिपाच्या हंगामात अतिवृष्टीची...
जैविक शेती मिशनद्वारे यूट्यूब चॅनलच्या...अमरावती ः कमी खर्चाच्या जैविक शेतीला प्रोत्साहन...
म्हैसाळ योजनेतून तलाव भरून देण्याची...सांगली ः म्हैसाळ उपसा योजना सुरू होऊन महिन्याचा...
बुलडाण्यात पीकविमा बचत खात्यात जमा...बुलडाणा ः जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचा पीकविमा...
समृद्धी महामार्गाच्या धुळीमुळे नुकसान...कारंजालाड, जि. वाशीम : समृद्धी महामार्गाच्या...
मका पिकाची हेक्टरी उत्पादकता वाढवा ः...बुलडाणा ः शासनाने यावर्षी पाऊस चांगला असताना...
अमरावती : पीककर्जाच्या व्याज माफीचा...अमरावती ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती...
जळगावात ज्वारी खरेदीसाठी स्वस्त धान्य...जळगाव : जिल्ह्यात भरडधान्याच्या साठवणुकीसाठी...
शेतकऱ्यांनो पीक कर्जासाठी ऑनलाइन मागणी...औरंगाबाद : ‘‘कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर होणाऱ्या...
केंद्राच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या...नाशिक : केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर...
परभणीत उद्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी परभणी  ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
जालना जिल्ह्यात नोंदणीकृत शेतकऱ्यांकडील...जालना : जिल्ह्यातील विविध बाजार समितींकडे...
घाटंजीत ४३ हजार हेक्‍टरवर कापूस...यवतमाळ ः घाटंजी तालुका कृषी विभागाने यावर्षी...
परभणी जिल्ह्यात पावणे तीन कोटींचा निधी...परभणी : वसुंधरा पाणलोट क्षेत्र विकास...
नांदेडचा फलोत्पादनाचा ८ कोटी ४२...नांदेड : एकात्मिक फलोत्पादन अभियानअंतर्गंत...
पिकांचे अवशेष, ऊस पाचटाचे व्यवस्थापन... नगर  : कोरडवाहू शेतीत तीन वर्षांतून...
नगर जिल्ह्यात ‘रोहयो’ची अडीच हजार कामे...नगर  ः मागेल त्याला काम देण्यासाठी...
‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर हिवरेबाजार...नगर  : हिवरेबाजार येथील कोरोना ग्रामसुरक्षा...
शेण खताची विल्हेवाट न लावल्यास होणार...अमरावती ः गावातील शेणाच्या ढिगामुळे रोगराईचा...
गडचिरोलीत मका खरेदीसाठी गोदाम उपलब्ध...गडचिरोली ः हमीभावाने मका खरेदीसाठी जिल्हा...