साताऱ्यात डाळिंबाला, तर सांगलीत पेरू, डाळिंब, लिंबाला फळपीक विमा लागू
साताऱ्यात डाळिंबाला, तर सांगलीत पेरू, डाळिंब, लिंबाला फळपीक विमा लागू

साताऱ्यात डाळिंबाला, तर सांगलीत पेरू, डाळिंब, लिंबाला फळपीक विमा लागू

कोल्हापूर : येत्या वर्षात (२०१९-२०) मध्ये बजाज अलियान्झ इन्शुरन्स कंपनीमार्फत सातारा जिल्ह्यामध्ये डाळिंब, तर सांगली जिल्ह्यामध्ये पेरू, डाळिंब आणि लिंबू या फळपिकांसाठी पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यास शासन मान्यता मिळाली असल्याची माहिती कोल्हापूरच्या विभागीय कृषी सहासंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

पेरू व लिंबू या फळपिकांसाठी बिगर कर्जदार व कर्जदार शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता भरून योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १४ जून २०१९ तर डाळिंब पिकाकरिता १५ जुलै २०१९ अशी आहे. या फळपिकांकरीता प्रतिहेक्टरी विमा संरक्षित रक्कम, विमा हप्ता आणि विमा संरक्षण कालावधी याप्रमाणे आहे.

डाळिंब या फळपिकासाठी प्रति हेक्टरी विमा संरक्षित रक्कम १ लाख २१ हजार रुपये, प्रति हेक्टर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता ६ हजार ५० रुपये, तर विमा संरक्षण कालावधी १५ जुलै ते ३१ डिसेंबर २०१९ असा राहिल. 

पेरू या फळपिकासाठी ५५ हजार रुपये, प्रति हेक्टरी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता २ हजार ७५० रूपये व विमा संरक्षण कालावधी १५ जून ते १५ ऑगस्ट २०१९. लिंबू या फळपिकासाठी प्रतिहेक्टरी विमा संरक्षित रक्कम ६६ हजार रुपये, प्रति हेक्टरी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता ३ हजार ३०० रुपये व विमा संरक्षण कालावधी १५ जून ते १५ ऑगस्ट २०१९ रुपये याप्रमाणे राहील. 

कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना बंधनकारक असल्याने सर्व कर्जदार शेतकऱ्यांनी त्यांच्या अर्ज मागणीच्या अर्जामध्ये नमूद केलेल्या पिकासाठी व क्षेत्रासाठी विमा संरक्षण घेणे बंधनकारक आहे. योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी जवळच्या प्राधिकृत बँका, प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी पतसंस्था, संबंधित विमा कंपनीची कार्यालये किंवा विमा प्रतिनिधींशी संपर्क साधून विमा प्रस्ताव विहित प्रपत्रात योग्य त्या विमा हप्त्यासह तसेच आवश्यक त्या कागद पत्रासह विहित वेळेत सादर करावी. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com