साताऱ्यात पावसाचा जोर कमी झाला

सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरल्याने धरणातील पाण्याची आवक कमी होऊ लागली आहे. परिणामी धरण व्यवस्थापनाकडून पाण्याच्या विसर्ग कमी करण्यात आला आहे.
साताऱ्यात पावसाचा जोर कमी झाला Satara received less rainfall
साताऱ्यात पावसाचा जोर कमी झाला Satara received less rainfall

सातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरल्याने धरणातील पाण्याची आवक कमी होऊ लागली आहे. परिणामी धरण व्यवस्थापनाकडून पाण्याच्या विसर्ग कमी करण्यात आला आहे. कोयना धरणाच्या दरवाजातून विसर्ग कमी करून तो २७ हजार ८६० व पायथा वीजगृहातून २१००, असा २९ हजार ९६० एकूण क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी प्रमुख धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात मोठ्या प्रमाण आवक होत होती. कोयना धरणात शुक्रवारी सकाळी आठ वाजता सहा वक्र दरवाज्यातून विसर्ग सुरू करण्यात आला होता. पावसाचा जोर वाढत राहिल्याने टप्याटप्याने विसर्ग वाढ करत नेण्यात आली. शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा जोर कमी होत गेल्याने विसर्ग कमी करण्यात आला. शनिवारी सकाळी आठपर्यंत धरण क्षेत्रातील कोयना २०४, नवजा २०७, महाबळेश्वर २८७ मिलिमीटर पाऊस झाला होता. तर धरणात एकूण ८७.१५ तर ८२.०३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला होता. दुपारी २ वाजता धरणात २७ हजार ८६० व पायथा वीजगृहातून २१००, असा २९ हजार ९६० एकूण क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात होता. इतर धरणाच्या पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग कमी करण्यात आला आहे. यामध्ये धोम १०४२०, कण्हेर ५२३७, उरमोडी, ४,६४५, तारळी ६८१०, धोम-बलकवडी ३१८३ क्युसेक विसर्ग केला जात आहे. शनिवारी पावसाचा जोर कमी झाल्याने सायकांळपर्यंत विसर्ग कमी केला जाणार आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत घट होऊन पूरस्थिती कमी होण्यास मदत होणार आहे. भूस्खलनात अकरा जणांचा मृत्यू  पाटण तालुक्यातील आंबेघर येथे झालेल्या भूस्खलनाच्या घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफच्या जवानांनी अकरा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढले आहेत. जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी झाला असून, भूस्खलन झालेल्या ठिकाणी एनडीआरएफच्या जवानांकडून आंबेघर, मिरगाव येथे शुक्रवारपासून काम सुरू करण्यात आले आहे. मिरगाव येथील १५०, आंबेघर ५०, ढोकावळे ५०, नांदगाव ५०, पाली १५ लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. शनिवारी भूस्खलन झालेल्या आंबेघर येथे दोनपर्यंत सहा मृतदेह काढण्यात आले आहेत. शनिवारी पावसाचा जोर ओसरला आहे. शनिवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत सरासरी एकूण ९२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पाली येथील पूर परिस्थितीची पाहणी केली आहे. पाटणमधील मिरगाव येथे भूस्खलन झालेल्या गावात बचाव कार्य कोयनेच्या  बॅक वॉटरमधून सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com