Agriculture news in marathi Satara received less rainfall | Page 3 ||| Agrowon

साताऱ्यात पावसाचा जोर कमी झाला

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 जुलै 2021

सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरल्याने धरणातील पाण्याची आवक कमी होऊ लागली आहे. परिणामी धरण व्यवस्थापनाकडून पाण्याच्या विसर्ग कमी करण्यात आला आहे.

सातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरल्याने धरणातील पाण्याची आवक कमी होऊ लागली आहे. परिणामी धरण व्यवस्थापनाकडून पाण्याच्या विसर्ग कमी करण्यात आला आहे. कोयना धरणाच्या दरवाजातून विसर्ग कमी करून तो २७ हजार ८६० व पायथा वीजगृहातून २१००, असा २९ हजार ९६० एकूण क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी प्रमुख धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात मोठ्या प्रमाण आवक होत होती. कोयना धरणात शुक्रवारी सकाळी आठ वाजता सहा वक्र दरवाज्यातून विसर्ग सुरू करण्यात आला होता. पावसाचा जोर वाढत राहिल्याने टप्याटप्याने विसर्ग वाढ करत नेण्यात आली. शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा जोर कमी होत गेल्याने विसर्ग कमी करण्यात आला.

शनिवारी सकाळी आठपर्यंत धरण क्षेत्रातील कोयना २०४, नवजा २०७, महाबळेश्वर २८७ मिलिमीटर पाऊस झाला होता. तर धरणात एकूण ८७.१५ तर ८२.०३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला होता. दुपारी २ वाजता धरणात २७ हजार ८६० व पायथा वीजगृहातून २१००, असा २९ हजार ९६० एकूण क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात होता. इतर धरणाच्या पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग कमी करण्यात आला आहे.

यामध्ये धोम १०४२०, कण्हेर ५२३७, उरमोडी, ४,६४५, तारळी ६८१०, धोम-बलकवडी ३१८३ क्युसेक विसर्ग केला जात आहे. शनिवारी पावसाचा जोर कमी झाल्याने सायकांळपर्यंत विसर्ग कमी केला जाणार आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत घट होऊन पूरस्थिती कमी होण्यास मदत होणार आहे.

भूस्खलनात अकरा जणांचा मृत्यू
 पाटण तालुक्यातील आंबेघर येथे झालेल्या भूस्खलनाच्या घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफच्या जवानांनी अकरा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढले आहेत. जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी झाला असून, भूस्खलन झालेल्या ठिकाणी एनडीआरएफच्या जवानांकडून आंबेघर, मिरगाव येथे शुक्रवारपासून काम सुरू करण्यात आले आहे. मिरगाव येथील १५०, आंबेघर ५०, ढोकावळे ५०, नांदगाव ५०, पाली १५ लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. शनिवारी भूस्खलन झालेल्या आंबेघर येथे दोनपर्यंत सहा मृतदेह काढण्यात आले आहेत. शनिवारी पावसाचा जोर ओसरला आहे.

शनिवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत सरासरी एकूण ९२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पाली येथील पूर परिस्थितीची पाहणी केली आहे. पाटणमधील मिरगाव येथे भूस्खलन झालेल्या गावात बचाव कार्य कोयनेच्या  बॅक वॉटरमधून सुरू आहे.


इतर बातम्या
कोकणात पावसाची दमदार हजेरीपुणे : राज्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे....
द्राक्षशेतीत परीक्षणानंतर...पुणे ः ‘‘अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन उत्तमरीत्या...
‘अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना  हेक्टरी...परभणी : अतिवृष्टीमुळे जमिनी खरडून गेल्या आहेत....
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
ज्वारी पेरली तर खरी,  पण वाचवायची कशी? अकोला : गेल्या काही वर्षांत सातत्याने ज्वारीचे...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
पुरंदरमध्ये लवकरच प्रॉपर्टी कार्ड : ...गराडे, जि. पुणे : स्वामित्व योजना...
आमच्या गावाला ग्रामपंचायत द्या...गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील रवी व मुल्लुरचक या...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
पुणे जिल्ह्यात तुरळक  ठिकाणी हलक्या...पुणे : दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण...
एकरकमी एफआरपीसाठी  भारतीय किसान संघाचे...पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर...
नगरला कांदा दरात  चढ-उतार सुरूच नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी  कुरुंदवाडमध्ये...कोल्हापूर : महापूर ओसरून दीड महिना झाला असून,...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
अखेर ‘चोसाका’ला मिळाली नवसंजीवनीचोपडा, जि. जळगाव  : ‘‘चोपडा शेतकरी सहकारी...