साताऱ्यात दहा किलो ढोबळीस ३०० ते ४०० रुपये

साताऱ्यात दहा किलो ढोबळीस ३०० ते ४०० रुपये
साताऱ्यात दहा किलो ढोबळीस ३०० ते ४०० रुपये

सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ७) ढोबळी मिरची, फ्लॅावर, दोडका, कारली, मेथी तेजीत असून, वाटाण्याच्या आवकेत वाढ झाली आहे. ढोबळी मिरचीची १० क्विंटल आवक झाली असून, दहा किलो मिरचीस ३०० ते ४०० असा दर मिळाला आहे. ढोबळी मिरचीस रविवारच्या (ता. ५) तुलनेत दहा किलो मागे १०० रुपयांची दरवाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  

फ्लॅावरची २१ क्विंटल आवक झाली असून, दहा किलो फ्लॅावरला १०० ते २०० असा दर मिळाला आहे. दोडक्याची १६ क्विंटवल आवक झाली असून, दहा किलो दोडक्यास २०० ते ३०० असा दर मिळाला आहे. कारल्याची दोन क्विंटल आवक झाली असून, दहा किलो कारल्यास २५० ते ३५० असा दर मिळाला आहे. वांग्याची १४ क्विंटल आवक झाली असून, दहा किलो वांग्यास १५० ते २६० असा दर मिळाला आहे. भेंडीची २३ क्विंटल आवक झाली असून, दहा किलो भेंडीस २०० ते ३२० असा दर मिळाला आहे.

गवारीची १८ क्विंटल आवक झाली असून, दहा किलोस २०० ते ३०० असा दर मिळाला आहे. पावट्याची २३ क्विंटल आवक झाली असून, दहा किलो पावट्यास १५० ते २०० असा दर मिळाला आहे. वॉल घेवड्याची आठ क्विंटल आवक झाली असून, दहा किलो घेवड्यास २५० ते ३०० असा दर मिळाला आहे. शेवग्याची १२ क्विंटल आवक झाली असून, दहा किलो शेवग्यास ३०० ते ४०० असा दर मिळाला आहे. ओली भुईमूग शेंगेची चार क्विंटल आवक झाली असून, दहा किलो शेंगेस ४०० ते ४५० असा दर मिळाला आहे. वाटाण्याच्या आवकेत वाढ झाली आहे.

वाटाण्याची ४३ क्विंटल आवक झाली असून, दहा किलो वाटाण्यास ३०० ते ३५० असा दर मिळाला आहे. पालेभाज्यात मेथी तेजीत आहे. मेथीची १६०० जुड्यांची आवक झाली असून, मेथीस शेकड्यास ८०० ते १००० असा दर मिळाला आहे. कोथिंबिरीची १८०० जुड्यांची आवक झाली असून, कोथिंबिरीस शेकड्यास ४०० ते ६०० असा दर मिळाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com