साताऱ्यात भेंडी २०० ते २५० रुपये दहा किलो

साताऱ्यात भेंडी २०० ते २५० रुपये दहा किलो
साताऱ्यात भेंडी २०० ते २५० रुपये दहा किलो

सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १६) भेंडी, वाटाणा, काकडी, काळा घेवडा तेजीत असून वांगी, दोडका, हिरवी मिरचीच्या आवकेत वाढ झाली आहे. भेंडीची १३ क्विंटल आवक होऊन दहा किलो भेंडीस २०० ते २५० असा दर मिळाला आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. वाटाण्याची दोन क्विंटल आवक होऊन दहा किलो वाटाण्यास ७०० ते ८०० असा दर मिळाला आहे. वाटाण्यास रविवारच्या (ता. १३) तुलनेत दहा किलोमागे १०० रुपयांची दरवाढ झाली अाहे. काकडीची २१ क्विंटल आवक होऊन दहा किलो काकडीस १०० ते २०० असा दर मिळाला आहे. काळा घेवड्याची एक क्विंटल आवक झाली असून दहा किलो घेवड्यास ३०० ते ३५० असा दर मिळाला आहे. भेंडी, काकडी, काळा घेवड्यास दहा किलो मागे ५० रुपयांची दरवाढ झाली आहे. ढोबळी मिरचीची २० क्विंटल आवक झाली असून दहा किलो ढोबळीस २०० ते २५० दर मिळाला. पावट्याची एक क्विंटल आवक होऊन पावट्यास दहा किलोस ४०० ते ५०० असा दर मिळाला आहे. ओल्या भुईमूग शेंगेची १४ क्विंटल आवक झाली असून दहा किलो शेंगेस ३०० ते ३५० असा दर मिळाला आहे. शेवग्याची १० क्विंटल होऊन दहा किलो १५० ते २०० असा दर मिळाला आहे. गवारीची सात क्विंटल आवक झाली असून दहा किलोस १५० ते २०० दर मिळाला आहे. वांगी, दोडका, हिरवी मिरचीच्या आवकेत वाढ झाली आहे. वांग्याची १३ क्विंटल आवक होऊन दहा किलोस ८० ते १२० असा दर मिळाला आहे. दोडक्‍याची पाच क्विंटल आवक होऊन दहा किलोस १५० ते २०० असा दर मिळाला आहे. हिरव्या मिरचीची २६ क्विंटल आवक झाली असून दहा किलो मिरचीस १०० के १५० असा दर मिळाला आहे. पालेभाज्यांत मेथीची एक हजार जुड्यांची आवक झाली असून मेथीस शेकड्यास १००० ते १२०० असा दर मिळाला आहे. कोथिंबिरीची १३०० जुड्यांची आवक झाली असून कोथिंबिरीस शेकड्यास ८०० ते १००० असा दर मिळाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com