agriculture news in marathi, Satbara online work is fast in Solapur district | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात ऑनलाइन सातबाऱ्याचे काम जोरात

टीम अॅग्रोवन
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

जिल्ह्यातील ११ लाख ८० हजार ३८३ पैकी आठ लाख ४१ हजार ३९८ सातबारा उतारे ऑनलाइन झाले आहेत. एक हजार १४४ गावांपैकी १३४ गावांत ९९ टक्के सातबारा उताऱ्याचे काम पूर्ण झाले. र्वरित गावांतील उताऱ्यांचे ऑनलाइनचे काम येत्या १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल. 
- अजित देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी

सोलापूर : जिल्ह्यात सातबारा उतारा ऑनलाइन करण्याचे काम जोरात सुरू आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्‍यांत जवळपास ७१ टक्के काम पूर्ण झाले आहे; पण उत्तर सोलापूर तालुक्‍याची सर्वाधिक पिछाडी दिसत आहे. या तालुक्‍यात केवळ २५ टक्केच काम झाले. हे काम कधी पूर्ण होणार, याबाबतही स्पष्टीकरण नसल्याने या तालुक्‍यातील शेतकऱ्यांना आणखी काही दिवस त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

डिजिटल इंडियाच्या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या महसूल खात्याने राज्यातील सर्व गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनीचे सातबारा उतारे ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले होते. यापूर्वी २०१७ मधील स्वातंत्र्य दिनापर्यंत राज्यातील सर्व गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनीचे सातबारा उतारे ऑनलाइन होणे अपेक्षित होते. अजूनही सातबारा उताऱ्याचे काम सुरूच आहे. 

दरम्यान, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मागील १ मेपासून ऑनलाइन सातबारा उतारा पूर्ण करण्याचे आदेश दिले होते; परंतु ते ऑनलाइन करण्याचे काम काही संपता संपत नाही. 
उत्तर सोलापूर तालुक्‍यात एकूण एक लाख ३७ हजार ३५० सर्व्हे क्रमांक आहेत. त्यापैकी केवळ २५ टक्केच सातबारा उताऱ्याचे काम पूर्ण झाले. मंगळवेढा तालुका सर्वांत पुढे असून, आतापर्यंत ८५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. एक हजार १४४ पैकी १३४ गावांतील ऑनलाइन सातबारा उताऱ्याचे काम ९९ टक्के पूर्ण झाले आहे. 

 


इतर ताज्या घडामोडी
वीज बिले न भरण्याचा ‘स्वाभिमानी’चा...सातारा  ः जावळवाडी (ता. सातारा) येथील मुख्य...
कोकणासह नवा महाराष्ट्र घडवूया :...रत्नागिरी  ः आकडा सांगण्यापेक्षा कृतीला...
कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी आता...नाशिक  : केंद्र सरकारने निर्यातबंदी केल्याने...
भाजपचे राज्यात २५ ला धरणे आंदोलन :...मुंबई : भारतीय जनता पक्ष येत्या मंगळवारी (ता. २५...
सांगलीत साडेसहा हजार शेतीपंपांच्या वीज...सांगली  ः  जिल्ह्यातील २०१८ पूर्वीच्या...
‘वनामकृवि’त सोयाबीनच्या पैदासकार ...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...
बोंडारवाडी धरणप्रश्नी मेढा येथे आंदोलनमेढा, जि. सातारा : बोंडारवाडी धरण झालेच पाहिजे,...
ज्वारी उत्पादन यंदाही आतबट्ट्यातचनगर ः दोन वर्षं दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर यंदा...
जांभुळणी तलावाच्या कालव्याला गळतीखरसुंडी, जि. सांगली : जांभुळणी (ता. आटपाडी) येथील...
महिला शक्‍तीतूनच नवसमाजाची जडणघडण  ः...अमरावती  ः ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती...
सोलापूर जिल्ह्यातील पाच नळपाणी योजना...सोलापूर : प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी...
परभणी जिल्ह्यात फळबागेची ६३९ हेक्टरवर...परभणी : यंदा सिंचन स्त्रोतांना पाणी उपलब्ध आहे....
आंबेगाव तालुक्यात प्रतिकूल हवामानामुळे...निरगुडसर, जि. पुणे ः यंदा हवामानातील बदल व...
नगर जिल्ह्यात ४८ हजार हेक्टरवर चारा...नगर : जिल्ह्यात यंदा पाण्याची बऱ्यापैकी...
जळगाव जिल्ह्यात तूर विक्रीबाबत ८००...जळगाव  ः जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीने...
पपई १४.५५ रुपये प्रतिकिलो शहादा, जि. नंदुरबार  : पपई उत्पादक शेतकरी व...
शेतीपंपांचा वीज वापर १६ टक्के; दाखविला...अकोला  ः शेतीपंपांचा वीज वापर १६ टक्केच होत...
कोल्हापुरात गवार, घेवड्याच्या दरात...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाला उठाव, दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगर जिल्ह्यात ज्वारीची आवक वाढली, दरात...नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...