सांगली जिल्ह्यात नोंदणीसाठी सातबारा मिळेना

सांगली : तुरीचा हंगाम संपत आला तरी सांगली बाजार समितीमध्ये तूर हमीभाव केंद्र सुरू केलेले नाही. तुरीचा हमीभाव प्रतिक्विंटल सहा हजार रुपये आहे.
Satbara was not available for registration in Sangli district
Satbara was not available for registration in Sangli district

सांगली : तुरीचा हंगाम संपत आला तरी सांगली बाजार समितीमध्ये तूर हमीभाव केंद्र सुरू केलेले नाही. तुरीचा हमीभाव प्रतिक्विंटल सहा हजार रुपये आहे. तरीही खुल्या बाजारात पाच हजार रुपयांनी खरेदी केली जात आहे. दरम्यान, सातबारा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करता येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

जिल्ह्यातील जत, कवठेमहाकांळ, आटपाडी, खानापूर, तासगाव, कडेगाव या तालुक्यात तुरीचे उत्पादन घेतले जाते. पुरेसा पाऊस झाल्यामुळे तुरीचे उत्पादन चांगले झाले आहे. तुरीची किमान आधारभूत किंमत क्विंटलला सहा हजार रुपये आहे. दरवर्षी सांगली येथील फेडरेशनमध्ये हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरु केले जाते. सुरवातीला तूर विक्रीसाठी नोंदणी करावी लागते. त्यानंतर त्यांना मोबाईलद्वारे तूर विक्रीसाठी घेऊन या असा संदेश पाठविला जातो. सध्या तुरीच्या खरेदीसाठी नोंदणी सुरु केली असली तरी, नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. 

गेल्या महिना ते दीड महिन्यांपासून तुरीचा हंगाम सुरु झाला आहे. सध्या हा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. तूर खरेदी केंद्र सुरु झाले नसल्याने शेतकऱ्यांनी स्थानिक बाजारपेठेत कमी दरात तुरीची विक्री केली असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागली  आहे. 

यंत्रणेच्या उदासीनतेमुळे फटका

हमीभाव केंद्र सुरू केली जातात, त्या यंत्रणेच्या उदासीनतेमुळे वेळेवर हमीभाव केंद्र सुरू केली जात नसल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक बाजार पेठेत तुरीला ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर आहे. त्यामुळे हमीभावापेक्षा ५०० ते ८०० रुपयांनी कमी दराने विक्री करावी लागत आहे. शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

तूर हमीभावने खरेदी करण्यासाठी नोंदणी सुरु केली आहे. परंतु, शेतकरी केवळ चौकशी करून जात आहेत. निवडणुकीचे कारण सांगून सातबारा शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे कारण सांगितले जात आहे. - दिलीप पाटील, जिल्हा पणन अधिकारी, सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com