Agriculture news in Marathi Satisfaction among farmers due to heavy rains in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात दमदार पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधान

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 जुलै 2020

नाशिक : जिल्ह्यात जूनच्या सुरुवातीला पावसाचे आगमन झाल्यानंतर पिकेही अंकुरली होती. मात्र, महिन्याच्या मध्यंतरीपासून पावसाने खंड दिला. त्यामुळे काही ठिकाणी पिके कोमेजून गेली. तर काही शेतकऱ्यांवर दुबार पेरण्यांची वेळ आली. अशातच पावसाची प्रतीक्षा लागून असताना सोमवारी (ता. २९) निफाड, मालेगाव, सटाणा पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चांगल्या पावसाची प्रतीक्षा संपली.

नाशिक : जिल्ह्यात जूनच्या सुरुवातीला पावसाचे आगमन झाल्यानंतर पिकेही अंकुरली होती. मात्र, महिन्याच्या मध्यंतरीपासून पावसाने खंड दिला. त्यामुळे काही ठिकाणी पिके कोमेजून गेली. तर काही शेतकऱ्यांवर दुबार पेरण्यांची वेळ आली. अशातच पावसाची प्रतीक्षा लागून असताना सोमवारी (ता. २९) निफाड, मालेगाव, सटाणा पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चांगल्या पावसाची प्रतीक्षा संपली.

त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले असून खरिपात मोठा आधार झाला आहे. प्रामुख्याने येवला, नांदगाव, चांदवड, निफाड, देवळा, सटाणा, कळवण व सिन्नर तालुक्यात मका, सोयाबीन व कापूस पिकासाठी पावसाची प्रतीक्षा कायम होती. तर पेठ, इगतपुरी, सुरगाणा व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भाताची रोपे पावसाविना पिवळी पडू लागली होती. मात्र, झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला. जिल्ह्यात दुपारनंतर पावसाने हजेरी लावल्यानंतर अनेक भागात शेतामध्ये पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.

जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस निफाड, मालेगाव, सटाणा तालुक्यात झाला. निफाड तालुक्यात काही ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्या. पेरणीची कामे मका सोयाबीनसह पूर्ण झाले तर काही ठिकाणी पेरण्या खोळंबल्या होत्या. पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी पावसाने हजेरी लावल्यामुळे समाधानी आहे. या पावसाने पिकांना जीवदान मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. कोकणगाव परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले.

देवळा व नांदगाव तालुक्यातील अनेक भागात दुपारनंतर जोरदार सरी झाल्या. पेठ, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागात भात, नागली पिकासाठी पावसाची प्रतीक्षा होती. मात्र, या पावसाने त्यांची अडचण सोडवली आहे.

जिल्ह्यात विविध ठिकाणचा जोरदार पाऊस (मिमी) : निफाड तालुका : सायखेडा ५४, लासलगाव ९२, पिंपळगाव बसवंत ८८, चांदोरी ५२. सटाणा तालुका : सटाणा ६६, ब्राह्मणगाव ४८, ताहाराबाद ४१, जायखेडा ६२, नामपूर ७५, नामपूर ७५, डांगसौदाणे ५२. देवळा तालुका : लोहोणेर ६०. मालेगांव तालुका ः मालेगांव ६६, दाभाडी ६१, वडनेर ७२, करजगव्हण ८२, निमगाव ५२. येवला तालुका : जळगाव नेउर ५६. कळवण तालुका : कळवण ४०. नाशिक तालुका : नाशिक ४०, माडसागंवी ८३.


इतर बातम्या
राज्याच्या कृषी आयुक्तपदी धीरज कुमार;...पुणे : राज्याच्या कृषी आयुक्तपदी धीरज कुमार यांची...
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...
जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटातजळगाव  ः जिल्ह्यात रोज सुमारे साडेसहा लाख...
जळगावात पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथजळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
`औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीची मुदत...औरंगाबाद : झालेली मका खरेदी व बाकी असलेली...
धुळे जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचा...देऊर, जि. धुळे  : जिल्ह्यात मका पिकावर...
सांगलीत दुग्ध व्यवसाय बंद पडण्याच्या...सांगली  ः शेतीपूरक दूग्ध व्यवसाय पशुखाद्य...
सिंधुदुर्गात दुध संकलनाची शासकीय...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात दुध संकलन करणाऱ्या...
कोल्हापुरात बिलांअभावी...कोल्हापूर : दुध संघांकडून वेळेत बिले मिळत...
‘पीकविमा प्रस्तावासाठी जनसुविधा केंद्र...नांदेड : ‘‘जिल्ह्यातील जनसुविधा केंद्र (सीएससी)...
परभणीत दर कपातीमुळे दूध उत्पादकांसमोर...परभणी : शासकीय दुग्धशाळेतील दूधाचे दर स्थिर आहेत...
सोलापुरात पावसाने जूनची सरासरी केली...सोलापूर  ः जिल्ह्यात यंदा पावसाने चांगली...
भाटघर, वीर, नीरा देवघर धरणांतील...सोलापूर  : सोलापूर, पुणे आणि सातारा...
पुणे जिल्ह्यात दूध दराअभावी शेतकऱ्यांचे...पुणे ः ‘कोरोना’मुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे....
हिंगोलीत ‘कर्जमुक्ती’तून ७० हजार...हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
साताऱ्यात कमी दूध दरामुळे उत्पन्न,...सातारा ः दुष्काळग्रस्त तसेच बागायती भागातील...
कृषी केंद्रात दरफलक नसल्यास...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालविणाऱ्या...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’ने केली वीज...सोलापूर : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यात...
नगर जिल्ह्यातील दुग्धोत्पादक मेटाकुटीलानगर ः जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग सुरू...
पदरमोड करून दूध व्यवसाय करण्याची...सोलापूर  ः चारा व पशुखाद्याच्या वाढत्या...