agriculture news in marathi, Satisfactory storage in big projects | Agrowon

मोठ्या प्रकल्पांत समाधानकारक जलसाठा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

जळगाव : जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये गणल्या जाणाऱ्या गिरणा व वाघूर धरणांचा साठा बऱ्यापैकी असून, त्यात आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. गिरणामध्ये ४७.७७ टक्के, तर वाघूरमध्ये ४५.२१ टक्के जलसाठा आहे. वाघूरमध्ये जलसाठा वाढल्याने जळगाव, जामनेरचा दोन वर्षांचा पाणीप्रश्‍न सुटणार आहे. तसेच या धरणातून भुसावळ, जळगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांना रब्बीसाठी दोन आवर्तने दिली जातील, अशी स्थिती असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.

जळगाव : जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये गणल्या जाणाऱ्या गिरणा व वाघूर धरणांचा साठा बऱ्यापैकी असून, त्यात आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. गिरणामध्ये ४७.७७ टक्के, तर वाघूरमध्ये ४५.२१ टक्के जलसाठा आहे. वाघूरमध्ये जलसाठा वाढल्याने जळगाव, जामनेरचा दोन वर्षांचा पाणीप्रश्‍न सुटणार आहे. तसेच या धरणातून भुसावळ, जळगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांना रब्बीसाठी दोन आवर्तने दिली जातील, अशी स्थिती असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.

गिरणाचा जलसाठा मागील तीन दिवसांत दोन टक्‍क्‍यांनी वाढला आहे. हतनूर धरणात ५०.९० टक्के जलसाठा आहे. त्याचे दोन दरवाजे दीड मीटरने उघडे आहेत. तापी नदीवरील धुळे जिल्ह्यातील सुलवाडे बॅरेजचे पाच दरवाजे एक मीटरने उघडे आहेत. शहादा (जि. नंदुरबार) तालुक्‍यातील तापी नदीवरील प्रकाशा बॅरेजचे सहा दरवाजे दोन मीटरने, तर सारंगखेडा बॅरेजचे सहा दरवाजे दोन मीटरने उघडे आहेत.

केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या रावेर तालुक्‍यातील मंगरूळ, अभोरा व सुकी हे मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. चोपडा (जि. जळगाव) व धुळे जिल्ह्याला लाभदायी असलेले अनेर धरण ६२.३९ टक्के भरले आहे. यावल तालुक्‍यातील सातपुडा पर्वतालगतचे मोर धरण ५० टक्के भरले आहे.

पाचोरा तालुक्‍यातील मध्यम प्रकल्पांमध्ये बहुळा प्रकल्प कोरडाच आहे. हिवरा प्रकल्पात ३०.३३ टक्के जलसाठा आहे. जामनेर तालुक्‍यातील तोंडापूर प्रकल्पाचा साठा किरकोळ वधारला असून, तो २.०५ टक्के झाला आहे. पश्‍चिम भागातील भोकरबारी, मन्याड, अंजनी, बोरी हे प्रकल्प कोरडेच आहेत.

धुळे जिल्ह्यातील पांझरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे; परंतु नदीमध्ये पाण्याचा विसर्ग बंद करण्याची स्थिती आहे. कारण पाऊस नाही. नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्येही समाधानकारक साठा नसल्याची माहिती मिळाली.


इतर बातम्या
पोषण आहारात ‘महानंद’ टेट्रापॅक दुधाचा...मुंबई : महानंद दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा...
बुलडाण्यात जिल्हाधिकारी चंद्रा यांनी...बुलडाणा  ः कृषी विभागामार्फत जिल्ह्यात...
‘पीएम-किसान’चा १२ कोटी शेतकऱ्यांना...नवी दिल्ली: शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदीसाठी...
नैसर्गिक रंग बनविण्याचे महिलांनी...अकोला  ः पुढील महिन्यात रंगपंचमीचा उत्सव जवळ...
आंबा, काजू क्लस्टरसाठी रत्नागिरी,...रत्नागिरी : विविध देशांमधील आंबा, काजूची निर्यात...
बदलत्या हवामानाचा गव्हाला फटकाअमळनेर, जि. जळगाव  : तालुक्‍यात गहू पिकाची...
भंडारा जिल्ह्यात धान विक्रीचे १११...भंडारा  ः शासनाने हमीभावात बोनसच्या...
पंजाबमध्ये भूमिहीन शेतमजुरांना कर्जमाफीचंदीगड, पंजाब: राज्याचा २०२०-२१ चा १.५४ लाख...
देशात ११० लाख टन हरभरा उत्पादनाचा अंदाजनवी दिल्ली: देशात यंदा हरभरा उत्पादनात वाढ...
‘पोकरा’तील सामुदायिक शेततळे, शेळीपालन...अकोला ः राज्यात राबविल्या जात असलेल्या नानाजी...
लाल कंधारी, देवणी गोवंश संवर्धनासाठी...परभणी  ः मराठवाडा विभागातील लाल कंधारी आणि...
गोंदिया जिल्ह्यात भरडाईच्या...गोंदिया  ः भरडाईसाठी धानाची उचल होण्याची गती...
आटपाडी तालुक्यात बंद साखर कारखान्यांचा...खरसुंडी, जि. सांगली : टेंभू योजनेच्या खात्रीशीर...
एक लाख टन मका म्यानमारमधून आयातनवी दिल्ली: देशात यंदा कमी उत्पादन झाल्याने...
सेवा हमी कायदा नागरिकांपर्यंत पोचवून...नाशिक  : सेवा हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार...
चांदवड येथे साडी नेसून आंदोलननाशिक : चांदवड खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून...
ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावीमुंबई  ः ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी ही...
राज्यातील बावीस कारखान्यांचा गाळप हंगाम...कोल्हापूर  : राज्यातील ऊस गाळप हंगाम हळूहळू...
नांदेड जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची...नांदेड : यंदा उन्हाळी हंगामात जिल्ह्यात गुरुवार (...
केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा :...हिंगोली : ‘‘केंद्र शासन पुरस्कृत योजनांचा लाभ...