नाशिक जिल्ह्यात धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा

नाशिक जिल्ह्यात धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा
नाशिक जिल्ह्यात धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा

नाशिक  : संपूर्ण जिल्हाभरात चांगले पर्जन्यमान असल्याने जिल्ह्यातील मुख्य धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट पाणीसाठा उपलब्ध आहे. या वर्षी चांगल्या पर्जन्यमानामुळे नोव्हेंबरअखेरीस जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. त्यानुसार आजमितीला जिल्ह्यातील धरणांमध्ये ८७ टक्के उपयुक्त पाणीसाठा असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली.  जिल्ह्यातील सर्व प्रकल्प नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पावसाने काठोकाठ भरले होते. सध्या जिल्ह्यातील प्रकल्पांत ५७ हजार ४८० दलघफूइतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.मागील वर्षी जिल्हयात केवळ २८ हजार ७४५ दलघफू म्हणजेच ४४ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. या वर्षी तो ८७ टक्के इतका उपलब्ध आहे. जिल्ह्याच्या त्यामुळे नागरी वापरासह शेतकऱ्यांना समाधानकारक आवर्तने देण्याचे निश्चित झाले आहे.  धरणांतील उपलब्ध पाणीसाठा असा (दलघफू)

धरण    पाणीसाठा  टक्केवारी 
गंगापूर  ४४४८  ७९
कश्यपी १७८० ९६
गौतमी गोदावरी   १७२४  ९२
आळंदी   ८२४  ४३
पालखेड २७९ ४३
करंजवण ५०४८  ९४
वाघाड  १७७१  ७७
ओझरखेड १९५० ९२
पुणेगाव ५३० ८५
तिसगाव  ४००  ८८
दारणा ५८४७ ८२
भावली  १३८२ ९६
मुकणे   ६२३७ ८६
वालदेवी १०२८  ९१
कडवा  १५०७ ८९
नांदूर मध्यमेश्वर    २२५  ८८
भोजापूर      ३४६  ९६
चणकापूर २३८९   ९८
हरणबारी १०२०  ८७
केळझर ४६४ ८१
नागासाक्या  ३८६ ९७
गिरणा १६२७३ ८८
पुनद  १३०३  १००
माणिकपुंज ३१९   ९५
एकूण ५७४८०  ८७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com