इरिगेशन असोसिएशन राज्य अध्यक्षपदी सतीश शेकडे

इरिगेशन असोसिएशन राज्य अध्यक्षपदी सतीश शेकडे
इरिगेशन असोसिएशन राज्य अध्यक्षपदी सतीश शेकडे

पुणे : इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र चॅप्टरच्या अध्यक्षपदी सतीश शेकडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. पुण्यात नुकत्यात झालेल्या सभेमध्ये अध्यक्ष व नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. येथे झालेल्या सर्वसाधारण सभेला महाराष्ट्र व इतर राज्यातील सर्व उत्पादक व कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष के. एम. महामुलकर यांनी अध्यक्षपदासाठी सतिश शेकडे यांचे नाव मांडले. त्यांना सर्व सदस्यांनी एकमताने पाठिंबा दिला. इरिगेशन इंडस्ट्रीमध्ये २७ वर्षांचा प्रदिर्घ अनुभव असलेले शेकडे हे सध्या आर. एम. ड्रीप ॲण्ड स्प्रिंकलर सिस्टिम लि. नाशिक या कंपनीमध्ये (डायरेक्टर - सेल्स ॲण्ड मार्केटिंग) नॅशनल हेड म्हणून काम पाहत आहेत.  या सभेमध्ये सभासद संख्या वाढवून संघटना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे, २०१८-१९ मधील अनुदानासंदर्भात, तसेच योजना सुरळीत चालण्यासाठीच्या अडचणी शासनस्तरावर मांडणे, तालुका ते कृषी आयुक्त स्तरावर एकसमान माहिती करणे, १ एप्रिलपासून ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यास मदत व्हावी, यासाठी २०१९-२० च्या कंपनी नुतनीकरणाबाबत समिती नेमणे, ठिबक व तुषार सिंचन अनुदानासाठी ८०० कोटी खर्च करण्यासाठी अनुदान प्रक्रिया जलद होण्यासाठी पाठपुरावा करण्याचे ठरले.  रवींद्र इंगोले यांनी आभार मानले, मावळते अध्यक्ष कमलेश यादव यांनी प्रास्ताविक केले. 

संघटनेची नूतन कार्यकारणी खालीलप्रमाणे : सुनील पाटील - उपाध्यक्ष, ड्रिप्स (फिनोलेक्स), अभय कुलकर्णी - उपाध्यक्ष, स्प्रिंकलर (नागार्जुना), संदीप जवळेकर - सचिव (इपीसी), संदीप देशपांडे - कोशाध्यक्ष (कॅप्टन), श्रीराम पाटील (साईराम), प्रीतेश नहार (पारस), गजेंद्र यादव (कोठारी), रवींद्र इंगोले (ॲक्वाॅगार्ड), महामुलकर (नेटाफिम), झुंबरलाल भंडारी (ड्रिप इंडिया), देविदास गोर्डे (नोबल), अविनाश बोबडे (किसान).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com