Agriculture news in Marathi, Save land and the environment by increasing organic curbs | Agrowon

सेंद्रिय कर्ब वाढवून जमीन आणि पर्यावरण वाचवा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

नाशिक : वातावरणातील बदलामुळे शेतीपुढे आव्हान उभे केले आहे. वातावरणातील कार्बन जास्तीत जास्त जमिनीत वापरून आपण या समस्येवर मात करू शकतो. सेंद्रिय कर्ब वाढविण्याकडे लक्ष द्या. पर्यावरण वाचवा, असे आवाहन ऑस्ट्रेलियातील ज्येष्ठ मृदाशास्त्रज्ञ डॉ. ग्रॅहम सेट यांनी केले. 

नाशिक : वातावरणातील बदलामुळे शेतीपुढे आव्हान उभे केले आहे. वातावरणातील कार्बन जास्तीत जास्त जमिनीत वापरून आपण या समस्येवर मात करू शकतो. सेंद्रिय कर्ब वाढविण्याकडे लक्ष द्या. पर्यावरण वाचवा, असे आवाहन ऑस्ट्रेलियातील ज्येष्ठ मृदाशास्त्रज्ञ डॉ. ग्रॅहम सेट यांनी केले. 

सह्याद्री फार्म्स यांच्या वतीने मोहाडी येथे ‘मातीचे आरोग्य आणि द्राक्ष पीक रोग प्रतिकारक्षमता’ या विषयावर बुधवारी (ता. ३१) व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी त्यांनी उपस्थित द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे नाशिक विभागाचे अध्यक्ष रवींद्र बोराडे, न्यूट्रिटेक सोल्यूशन कंपनीचे भारत प्रमुख श्री. झुनझुनवाला, सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे उपस्थित होते. 

डॉ. ग्रॅहम सेट म्हणाले, ‘‘कीटकनाशकांचे प्रमाण वाढत असताना त्यांचे आक्रमणही वाढते आहे. याबाबत अभ्यास केला असता याचा संबंध अन्नद्रव्य व्यवस्थापनाशी आहे हे लक्षात आले. जमिनीच्या वरचा थर हा चार ते पाच इंचाचा थर दरवर्षी वाहून जातो. हे जगभरात फार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत.’’

या वेळी विलास शिंदे यांनी मागील वर्षीच्या हंगामाचा आढावा घेतला. रवींद्र बोराडे यांनी मार्गदर्शन केले. मंगेश भास्कर यांनी प्रास्ताविक केले. सचिन वाळुंज यांनी आभार मानले.

डॉ. ग्रॅहम सेट यांच्या व्याख्यानातील महत्त्वाचे मुद्दे 

  • जमिनीतील कार्बन वाढविण्यासाठी पुढील बाबींकडे लक्ष द्या.
  • तण जाळणे थांबवा. ती जमिनीत कुजवा.
  • आच्छादन पिके घ्या. एकदल, द्विदल धान्य पिके उपयुक्त ठरतात.
  • आच्छादन पिकांत विविधता ठेवा. त्यांच्यातील वाढीच्या स्पर्धेचा उपयोग करून घ्या.
  • ह्युमसच्या वाढीवर सतत भर द्या.
  • जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढवण्यासाठी कंपोस्ट खत वापरावे.
  • कमीत कमी मशागत तंत्राचा अवलंब करा.
  • गांडुळांची उपलब्धता वाढवा.

इतर बातम्या
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
शेतकरी गटांनी बीजोत्पादन कार्यक्रम...अकोला ः अधिक उत्पादनासाठी शेतकरी गटांनी...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
पुणे जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींना ‘...पुणे : जलजन्य साथरोग, आजारांचा धोका उद्भवू नये,...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
निर्यातबंदीमुळे कांदा फुगवटा;...पुणे: कांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी तातडीने...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
चारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...