पीक विम्याची रक्कम बचत खात्यांत जमा करा ः बोराडे

नाशिक: बॅंकांनी कोरोनाच्या काळात पीक विम्याची रक्कम कर्ज खात्यांत जमा करून पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांची पूर्ण कोंडी केली आहे. ही रक्कम बचत खात्यात जमा करावी. आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रांतिक सदस्य सोमनाथ बोराडे यांनी दिला.
Saving crop insurance amount in Credit : Borade
Saving crop insurance amount in Credit : Borade

नाशिक : बॅंकांनी कोरोनाच्या काळात पीक विम्याची रक्कम कर्ज खात्यांत जमा करून पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांची पूर्ण कोंडी केली आहे. ही रक्कम बचत खात्यात जमा करावी. आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रांतिक सदस्य सोमनाथ बोराडे यांनी दिला. 

खरिपाची पेरणी तोंडावर असल्याने शेतकरी बँकाकडे विनवण्या करीत आहेत. बँकांची मुजोरी मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आता शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय पीकविम्याची रक्कम कर्ज खात्यात जमा करण्याचा प्रकार सुरू आहे. तो नियमबाह्य आहे. या अडचणीत शेतकऱ्यांचा एक रुपयाही बँकांना रोखता येत नाही. या प्रश्नावर संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी चकार शब्द बोलत नाहीत. पीक विमा बँकांना मिळतो. तो थेट शेतकऱ्याच्या खात्यांत का मिळत नाही?असा सवाल बोराडे केला. 

बँकेने शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करून पिकविम्याची रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली असल्याचे प्रमाणपत्र विमा कंपनीस पाठवणे आवश्यक आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी विमा कंपनीच्या साहाय्याने पीकविमा संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. एखादा शेतकरी वित्तीय संस्थेच्या चुकीमुळे योजनेच्या लाभापासून वंचित राहिला, तर त्या शेतकऱ्याला देय असणारी नुकसान भरपाई अदा करण्याची जबाबदारी संबंधित बँकेची राहील.

बॅंकांनी नरमाईची भूमिका घेऊन शेतकऱ्यांची विम्याची रक्कम रोखून ठेवू नये. यामध्ये राज्य शासनाने व केंद्र सरकारने लक्ष घालावे, अन्यथा विम्यासाठी होणाऱ्या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटतील, असे बोराडे यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com