Agriculture news in Marathi Saving time and money through direct input supply: MLA Dhurve | Agrowon

थेट निविष्ठा पुरवठ्यातून वेळ-पैशांची बचत ः आमदार धुर्वे

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मे 2020

यवतमाळ ः कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता व्यापक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. कृषी विभागाची थेट बांधावर निविष्ठा पुरवठा योजना देखील त्यातीलच एक आहे. या माध्यमातून कमी दरात थेट बांधावर निविष्ठांचा पुरवठा होणार असल्याने वेळ आणि पैशांची बचत होईल. त्यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी केले.

यवतमाळ ः कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता व्यापक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. कृषी विभागाची थेट बांधावर निविष्ठा पुरवठा योजना देखील त्यातीलच एक आहे. या माध्यमातून कमी दरात थेट बांधावर निविष्ठांचा पुरवठा होणार असल्याने वेळ आणि पैशांची बचत होईल. त्यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी केले.

आर्णी तालुक्‍यात शेतकरी गटामार्फत निविष्ठा पुरवठा उपक्रमाची सुरुवात आमदार धुर्वे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. श्री. धुर्वे म्हणाले, खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी निविष्ठा खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी करतील. यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे शक्‍य होणार नाही. त्यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी नोंदणीकृत गटांकडे हव्या असलेल्या निविष्ठांची मागणी नोंदवावी. गटांमार्फत त्यांना थेट बांधावरच निविष्ठा पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून कोरोनाचा संगर्सही टाळणे शक्‍य होईल आणि थेट निविष्ठांचा पुरवठा झाल्याने पैसा आणि वेळेची देखील बचत होणार आहे.

या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी रमेश पसलवाड, अविनाश पवार, नितीन ठाकरे, योगेश काठोळे, अरविंद गावंडे, भास्कर पाटील, अमीत ठाकरे, बंटी चव्हाण, विशाल देशमुख, लक्ष्मण परळीकर, आर. के. टेलर, विनोद देवकर, गजानन ठाकरे, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक, पर्यवेक्षक आत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक उपस्थित होते.

 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...
जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटातजळगाव  ः जिल्ह्यात रोज सुमारे साडेसहा लाख...
जळगावात पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथजळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
`औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीची मुदत...औरंगाबाद : झालेली मका खरेदी व बाकी असलेली...
धुळे जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचा...देऊर, जि. धुळे  : जिल्ह्यात मका पिकावर...
सांगलीत दुग्ध व्यवसाय बंद पडण्याच्या...सांगली  ः शेतीपूरक दूग्ध व्यवसाय पशुखाद्य...
सिंधुदुर्गात दुध संकलनाची शासकीय...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात दुध संकलन करणाऱ्या...
कोल्हापुरात बिलांअभावी...कोल्हापूर : दुध संघांकडून वेळेत बिले मिळत...
‘पीकविमा प्रस्तावासाठी जनसुविधा केंद्र...नांदेड : ‘‘जिल्ह्यातील जनसुविधा केंद्र (सीएससी)...
परभणीत दर कपातीमुळे दूध उत्पादकांसमोर...परभणी : शासकीय दुग्धशाळेतील दूधाचे दर स्थिर आहेत...
सोलापुरात पावसाने जूनची सरासरी केली...सोलापूर  ः जिल्ह्यात यंदा पावसाने चांगली...
भाटघर, वीर, नीरा देवघर धरणांतील...सोलापूर  : सोलापूर, पुणे आणि सातारा...
पुणे जिल्ह्यात दूध दराअभावी शेतकऱ्यांचे...पुणे ः ‘कोरोना’मुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे....
हिंगोलीत ‘कर्जमुक्ती’तून ७० हजार...हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
साताऱ्यात कमी दूध दरामुळे उत्पन्न,...सातारा ः दुष्काळग्रस्त तसेच बागायती भागातील...
कृषी केंद्रात दरफलक नसल्यास...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालविणाऱ्या...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’ने केली वीज...सोलापूर : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यात...
नगर जिल्ह्यातील दुग्धोत्पादक मेटाकुटीलानगर ः जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग सुरू...
पदरमोड करून दूध व्यवसाय करण्याची...सोलापूर  ः चारा व पशुखाद्याच्या वाढत्या...
कोल्हापुरात वाढीव वीज बिलांची होळीकोल्हापूर : वाढीव वीज बिलांविरोधात येथील...