पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती ः नितीन सुपेकर

Saving Water is the Generation of Water: Nitin Supekar
Saving Water is the Generation of Water: Nitin Supekar

बुलडाणा : निसर्गात उपलब्ध असलेले पाणी मर्यादित आहे. या पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाणी संपल्यास त्याची निर्मिती करणे शक्य नाही. तरी शक्यतो आपण पाण्याचा वापर नियंत्रित करून पाणी वाचवावे. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती आहे, असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता नितीन सुपेकर यांनी केले.

गतवर्षीच्या सिंचनात १० टक्के वाढ करणे व उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी जनप्रबोधन करण्याच्या मुख्य उद्देशाने २२ मार्चपर्यंत जलजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाचे उद्‍घाटन बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ कार्यालयात पार पडले. त्या वेळी सुपेकर बोलत होते.

या प्रसंगी कार्यकारी अभियंता सुनील चौधरी, एम. एस. कदम, एस. डी. राळेकर, सहायक अधीक्षक अभियंता तुषार मेतकर, राहुल आवारे, अ. प्र. वानखेडे, यो. ज. कापडणीस, उपकार्यकारी अभियंता विजयसिंग राजपूत, शाखा अभियंता अनिल खानझोडे आदींसह जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचारी, अशासकीय सदस्य चंद्रकांत साळुंके उपस्थित होते. 

यावेळी जिल्ह्यातील खडकपूर्णा, पैनगंगा, वान, मन, नळगंगा, पूर्णा, ज्ञानगंगा, विश्वगंगा या प्रमुख नद्यांमधील पाण्याचे जलपूजन छोटेखानी स्वरूपात करण्यात आले. कार्यक्रमावेळी अधीक्षक अभियंता नितीन सुपेकर यांनी उपस्थितांना जलप्रतिज्ञा दिली.

देशात कोरोना विषाणूचा होत असलेला वाढता प्रसार लक्षात घेता, जिल्हाधिकारी यांनी जास्तीत जास्त जनसमुदाय टाळण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे या वर्षी जलजागृती सप्ताहाचे आयोजन मर्यादित स्वरूपात करण्यात आले आहे. या बदलत्या मोठा जनसमुदाय जमा होईल, असे कार्यक्रम न घेता ध्वनिफीत, जलजागृती करणारे फ्लेक्स लावणे याबाबत फेरनियोजनही करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार होऊ नये म्हणून २० मार्च २०२० रोजी आयोजित केलेली जल दौड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत साळुंके यांनी केले. कार्यक्रमाला विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com