बचत करणे महिलांचा स्थायी स्वभाव ः येरावार

बचत करणे महिलांचा स्थायी स्वभाव ः येरावार
बचत करणे महिलांचा स्थायी स्वभाव ः येरावार

यवतमाळ ः ‘‘आजच्या महिला ‘चूल, मूल’ या संकल्पनेतून बाहेर पडल्या आहेत. कुटुंबाचा विचार केला तर घरचे सर्व आर्थिक नियोजन महिलाच करतात. कधीकधी तर पदरमोड करून त्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करीत असतात. एक प्रकारे बचत हा महिलांचा स्थायी स्वभाव बनला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. 

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नियोजन विभाग, जिल्हा अग्रणी बॅंक आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने दादासाहेब कोल्हे सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. महिला बचत गट, हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची स्पर्धेतील विजेते, तसेच मुद्रा बॅंक योजनेतील लाभार्थ्यांना धनादेशवाटप करण्याच्या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. 

या वेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक विजय भगत, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक डॉ. रंजन वानखेडे, केव्हीकेचे डॉ. प्रमोद यादगिरवार उपस्थित होते.  नावीन्यपूर्ण योजनांसाठी सरकारचे प्राधान्य आहे. शेळीपालन, परसबाग, वेगवेगळे प्रक्रिया उद्योग, कृषी अवजारे आदींसाठी २.७३ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सध्या मार्केटिंग, ब्रॅंडिंग आणि पॅकेजिंगचे युग आहे. त्यामुळे याबाबत महिलांना प्रशिक्षित करणे आवश्‍यक आहे, असे पालकमंत्री येरावार यांनी व्यक्‍त केली. 

या गटांचा झाला गौरव जागृती बचत गट (धानोरा, ता. झरीजामणी), अनसूया बचत गट (टेंभी, ता. झरीजामणी), समृद्धी महिला बचत गट (नेर), उन्नती महिला बचत गट (राळेगाव), श्रद्धा स्वयंसाह्यता समूह (पांढरकवडा), आदिशक्‍ती महिला बचत गट (घाटंजी) यांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com