agriculture news in marathi, Savings groups items Attraction of Nagpur | Agrowon

बचत गटांच्या वस्तूंचे नागपूरकरांना आकर्षण
टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

नागपूर : दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राच्या प्रांगणात ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे आयोजित महालक्ष्मी सरस प्रदर्शन सणासुदीच्या काळामध्ये नागपुरकरांमध्ये आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. विविध राज्यांतील १६० पेक्षा अधिक बचत गटांचे विविधांगी वस्तूंचे स्टॉल्स येथे लागलेले आहेत.

नागपूर : दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राच्या प्रांगणात ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे आयोजित महालक्ष्मी सरस प्रदर्शन सणासुदीच्या काळामध्ये नागपुरकरांमध्ये आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. विविध राज्यांतील १६० पेक्षा अधिक बचत गटांचे विविधांगी वस्तूंचे स्टॉल्स येथे लागलेले आहेत.

राज्यभरातील बचत गटांच्या माध्यमातून लोककलेचा वारसा जपलेले अनेक शुशोभित वस्तू या प्रदर्शनात आहेत. ओरिसा येथील ‘माँ मंगला’ या महिला बचत गटातर्फे निर्मित कापडी पिशव्या, सुशोभित कापडी पर्सेस, मोबाईल पाऊच अशा हस्तनिर्मित उपयोगी उत्पादने ग्राहकांचे मन वेधून घेत आहेत. या बचत गटामध्ये ५० महिला काम करीत असून त्यांना यातून चांगली मिळकत होत आहे.

येथील ‘सिद्धार्थ स्वयं सहायता महिला बचत गटा’तर्फे मधमाश्‍या पालन हा व्यवसाय केला जातो. हा मधही येथे उपलब्ध आहे. मधमाश्‍या पालनासाठी येथे सातेरी तसेच इटालियन मधूमक्षिकांचा वापर करण्यात येतो. प्रामुख्याने इटालियन मधूमक्षिका सर्वाधिक उत्पादन देतात. बचत गटांच्या माध्यमातून या मधमाश्‍यांना मधू पेट्यांमध्ये पाळतात. या मधमाश्‍यांच्या पेट्या मोहरी, ओवा, धने, सूर्यफूल आदीच्या पिकात ठेवण्यात येतात. शेती उत्पादनात परागी भवनात मधमाश्‍यांचे महत्त्व आहे. यामुळे केवळ मधमाश्‍या पालनाविषयी माहिती जाणून घेण्यासह विविध चवींचा मध चाखण्यासाठीदेखील या स्टॉलवर विशेष गर्दी होत आहे.

इतर ताज्या घडामोडी
राज्यात हिरव्या मिरचीला १८०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला...
अकोल्यात कृषी सहायकांचे पदोन्नतीच्या...अकोला  ः अमरावती विभागातील कृषी सहायकांच्या...
सांगलीच्या पूर्व भागातील अग्रणी कोरडीठाकसांगली  ः  सांगली जिल्ह्याच्या चार...
सातारा जिल्ह्यातील ‘मराठवाडी’च्या...ढेबेवाडी, जि. सातारा : गेल्या काही...
नगर जिल्ह्यात चार महसूल मंडळांत पावसाची...नगर : जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पावसाने...
हलक्या सरींना सुकलेल्या पिकांना...उस्मानाबाद/ लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद...
‘पोकरा’तील शेतकऱ्यांनाही मिळणार सूक्ष्म...अकोला  ः राज्यात दुष्काळाच्या झळा सहन...
राज ठाकरे यांची दिवसभर चौकशीमुंबई ः कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत...
मागासवर्गीय शेतकऱ्यांना विहिरींसाठी ३७४...पुणे  : राज्यातील मागास गटातील शेतकऱ्यांना...
एचटी कापूस वाण परवानगीची बियाणे...नागपूर ः शेतकऱ्यांकडून अवैधरीत्या तणाला सहनशील (...
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...