agriculture news in marathi, savitri weekly bazar starts soon in zp, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘सावित्री आठवडा बाजार’
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 जानेवारी 2019

बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालास कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध झाल्यास त्यांचे जीवनमान उंचावेल. त्यांना उपजीविकेचे शाश्वत साधन उपलब्ध होईल, या उद्देशाने जिल्हा परिषद व जिल्हा विकास यंत्रणेने आठवडा बाजाराचा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. शहर आणि परिसरातील नागरिकांनी बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या खरेदीसाठी आठवडे बाजाराला भेट द्यावी.
- विश्‍वास देवकाते, अध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे.

पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट) माध्यमातून एकत्रित येऊन परंपरागत आणि नैसर्गिक बाबींचा उपयोग करून तयार केलेल्या उत्पादनांना योग्य ठिकाणी हक्काची बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने दर रविवारी जिल्हा परिषदेच्या वाहनतळावर ‘सावित्री आठवडा बाजार’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रभाकर गावडे यांनी दिली. 

प्रजासत्ताकदिनी (शनिवारी, ता. २६) जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांच्यासह पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे प्रातिनिधिक उद्घाटन होणार आहे. रविवारपासून (ता. २७) दर रविवारी हा आठवडे बाजार सुरू राहणार आहे. आठवडा बाजारात २२ स्टॉल सुरू करण्यात येणार आहेत. आठवडे बाजारात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या बचत गटांनी नोंदणी करणे आवश्‍यक आहे. बाजार सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांनी रोटेशन पद्धतीने नवीन बचत गटांना संधी देण्यात येईल. 

महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत जिल्ह्यात ५८७८ बचत गट सुरू आहेत. या स्वयंसहायता बचत गटांनी उत्पादित केलेल्या लोणची, वनस्पतींपासून तयार करण्यात आलेले तेल, मध, सेंद्रिय हळद, गूळ, हातसडीचा तांदूळ, कापडी पिशव्या, लाकडी खेळणी, सेंद्रिय व जैविक खते, बांबूपासून बनविलेल्या वस्तू, कडधान्य, घोंगडी आदी वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण उत्पादनांची विक्री या आठवडे बाजारात होणार आहे. 
 

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलाच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ...मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या...
शेतकऱ्यांना अनुदानावर सेफ्टी किटचा...यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका...इंग्लंडमध्ये लाळ्या खुरकुत (एफएमडी), बोव्हाईन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन डोंगर...सिंधुदुर्ग : अतिवृष्टीने खचलेल्या डोंगरांपैकी...
कॉंग्रेसच्या आजपासून ‘महापर्दाफाश' सभा...मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि...
जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी...मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत ...
ड्रायझोनमधील वरुडला ठिबक अनुदानातून...अमरावती  ः सर्वाधिक संत्रा लागवड व...
जलसमस्येवरील उपायांच्या प्रयत्नात...औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यात निर्माण होणाऱ्या...
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...