agriculture news in marathi, saylo wine starts purchasing grapes, nashik, maharashtra | Agrowon

तडे गेलेल्या द्राक्षांची खरेदी; वाईनसाठी होणार वापर 

टीम अॅग्रोवन
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

नाशिक : कसमादे पट्ट्यातील पूर्वहंगामी द्राक्ष प्लॉट काढणीसाठी आले असताना पावसामुळे येथील बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तयार झालेल्या द्राक्षांना पावसामुळे तडे गेल्याने ही द्राक्षे अक्षरशः फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मात्र, पिंपळगाव बसवंत येथील सायलो वाईनचे संचालक विश्‍वास माधवराव मोरे यांनी तडे गेलेली द्राक्षे वाइन निर्मितीसाठी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकडून शेतकऱ्यांची तडे गेलेली द्राक्ष पिंपळगाव बसवंत येथे सायलो वाईनरीत दाखल होत आहे. परिणामी, नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादकांना थोडा फार आधार मिळाला आहे. 

नाशिक : कसमादे पट्ट्यातील पूर्वहंगामी द्राक्ष प्लॉट काढणीसाठी आले असताना पावसामुळे येथील बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तयार झालेल्या द्राक्षांना पावसामुळे तडे गेल्याने ही द्राक्षे अक्षरशः फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मात्र, पिंपळगाव बसवंत येथील सायलो वाईनचे संचालक विश्‍वास माधवराव मोरे यांनी तडे गेलेली द्राक्षे वाइन निर्मितीसाठी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकडून शेतकऱ्यांची तडे गेलेली द्राक्ष पिंपळगाव बसवंत येथे सायलो वाईनरीत दाखल होत आहे. परिणामी, नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादकांना थोडा फार आधार मिळाला आहे. 

कसमादे भागात रंगीत व सफेद वाणांच्या द्राक्षबागा आहेत. मात्र, सततच्या पावसामुळे द्राक्षांना तडे गेल्याने माल मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे. त्यामुळे उत्पादन येऊनही हा माल फेकून द्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत व्यापारी शेतकऱ्यांकडून माल खरेदी करण्यास नकार देत आहेत. त्यामुळे विश्वासराव मोरे यांनी वाइननिर्मितीसाठी प्रक्रियायोग्य माल खरेदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्या मालाची प्रत थोडीफार चांगली आहे. असा माल खरेदी करण्यात येत आहे. 

शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढला आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते व वाइन उद्योगाचे जनक माधवराव खंडेराव मोरे यांचे चिरंजीव आणि सायलो वाइनचे संचालक विश्वासराव मोरे यांनी शेतकऱ्यांकडील द्राक्षे चांगल्या भावात खरेदी करण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा प्रयत्न केला आहे. त्यानुसार सटाणा भागातून अनेक शेतकरी आता द्राक्ष पिंपळगाव बसवंत येथील सायलो वाइनकडे रवाना करत आहे. द्राक्ष क्रशिंग व वाइननिर्मितीचा हंगाम  नसतानाही विश्वासराव मोरे यांनी परिश्रम घेऊन आपल्या प्रकल्पात द्राक्षांवर प्रक्रिया सुरू केली आहे.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...
जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटातजळगाव  ः जिल्ह्यात रोज सुमारे साडेसहा लाख...
जळगावात पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथजळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
`औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीची मुदत...औरंगाबाद : झालेली मका खरेदी व बाकी असलेली...
धुळे जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचा...देऊर, जि. धुळे  : जिल्ह्यात मका पिकावर...
सांगलीत दुग्ध व्यवसाय बंद पडण्याच्या...सांगली  ः शेतीपूरक दूग्ध व्यवसाय पशुखाद्य...
सिंधुदुर्गात दुध संकलनाची शासकीय...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात दुध संकलन करणाऱ्या...
कोल्हापुरात बिलांअभावी...कोल्हापूर : दुध संघांकडून वेळेत बिले मिळत...
‘पीकविमा प्रस्तावासाठी जनसुविधा केंद्र...नांदेड : ‘‘जिल्ह्यातील जनसुविधा केंद्र (सीएससी)...
परभणीत दर कपातीमुळे दूध उत्पादकांसमोर...परभणी : शासकीय दुग्धशाळेतील दूधाचे दर स्थिर आहेत...
सोलापुरात पावसाने जूनची सरासरी केली...सोलापूर  ः जिल्ह्यात यंदा पावसाने चांगली...
भाटघर, वीर, नीरा देवघर धरणांतील...सोलापूर  : सोलापूर, पुणे आणि सातारा...
पुणे जिल्ह्यात दूध दराअभावी शेतकऱ्यांचे...पुणे ः ‘कोरोना’मुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे....
हिंगोलीत ‘कर्जमुक्ती’तून ७० हजार...हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
साताऱ्यात कमी दूध दरामुळे उत्पन्न,...सातारा ः दुष्काळग्रस्त तसेच बागायती भागातील...
कृषी केंद्रात दरफलक नसल्यास...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालविणाऱ्या...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’ने केली वीज...सोलापूर : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यात...
नगर जिल्ह्यातील दुग्धोत्पादक मेटाकुटीलानगर ः जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग सुरू...
पदरमोड करून दूध व्यवसाय करण्याची...सोलापूर  ः चारा व पशुखाद्याच्या वाढत्या...
कोल्हापुरात वाढीव वीज बिलांची होळीकोल्हापूर : वाढीव वीज बिलांविरोधात येथील...