साखरेचे इथेनॉलमध्ये रूपांतरासाठी केंद्राला प्रस्ताव ः संजय खताळ

इथेनाॅल
इथेनाॅल

पुणे ः गळीत हंगामाच्या तोंडावर साखरेची मागणी घटली आहे. राज्यात ६५ लाख टन साखर अजूनही पडून आहे. यामुळे साखर उद्योग अडचणीत येत आहे. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम दिली असली तरी कामगार, वाहतूक, व्यापारी यांची अजूनही देणी दिलेली नाहीत. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी साखरेचे इथेनॉलमध्ये रूपांतरासाठी केंद्र शासनाला प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी दिली.     साखर विश्व प्रतिष्ठान आणि शुगर इंडस्ट्रीज ऋणानुबंध यांच्या संयुक्त विद्यमाने साखर कामगार, कर्मचारी व शेतकऱ्यांसाठी पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानकाजवळील डीएसटीए हॉल येथे रविवारी (ता. २८) स्नेहमेळावा आयोजित केला होता. या वेळी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, ज्येष्ठ ऊस उत्पादक शेतकरी मोहनराव होलम पाटील, नॅशनल फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते. श्री. खताळ म्हणाले की, साखर उद्योगात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे देशात ओळखले जात होते. मात्र, आता ही ओळख कमी झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्राला मागे टाकून उत्तर प्रदेश पुढे गेले आहे. उत्तर भारतातील साखरेची गरज महाराष्ट्राऐवजी उत्तर प्रदेश भागवू लागले आहे. राज्यातील काखान्यांनी वेळीच बदल करून कारखाने इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे कार्यकारी संचालक अजित चौगुले, जयवंत शुगरचे अध्यक्ष चारुदत्त देशपांडे, श्रीनाथ म्हस्कोबा शुगरचे मुख्याधिकारी दत्ताराम रासकर, जागृती शुगरचे प्रकल्प व्यवस्थापक सुनीलकुमार देशमुख, गोकुळ शक्तीचे कार्यकारी संचालक समीर सलगर, अंबालिक शुगरचे अॅटो कॅड इंजिनिअर अविनाश कुटे पाटील, महेश जोशी, साहेबराव खामकर, दासराव कातोरे आदी उपस्थित होते.  कोणत्या पद्धतीने चालवायचे, हे उत्तर प्रदेशातील कारखान्यांकडून शिकले पाहिजे. त्यासाठी आपल्यालाच सुधारणा कराव्या लागणार आहेत. पूर्वीच्या कामगारांच्या भरवशावर पुढे जायचे ठरवले तर आपण मागे पडणार आहे. त्यामुळे साखर कारखाने अडचणीत येत आहेत.  साखर विश्व प्रतिष्ठानने नवीन संस्थेची नोंदणी केली आहे. त्यासाठी चांगला पाठिंबा मिळत आहे. साखर कारखानदारांनी क्रांती केली आहे. रस्ते, शाळा, बाजारपेठा तयार झाल्या आहेत. त्याचा लाभ कामगारांना का होत नाही, याचा विचार करून या विस्तृत जाळ्याचा फायदा घेण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून पुढे आले पाहिजे.  नॅशनल फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे म्हणाले, की साखर कारखान्यातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे. समाजातील बदलाचा आपल्यावर थेट परिणाम होतो. हे ओळखून योग्य वेळीच बदल केला पाहिजे. यातूनच कौशल्य विकास जागृत करू शकतो. त्यासाठी उपायोजना केल्या पाहिजेत. कार्यक्रमात अंबालिक शुगरचे अॅटो कॅड इंजिनिअर अविनाश कुटे पाटील यांनी प्रास्ताविक केले; तर अनिल शेवाळे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com