agriculture news in marathi SC proposes to appoint former HC judge to monitor ongoing probe | Page 3 ||| Agrowon

लखीमपूर खेरी हिंसाचार : माजी न्यायाधीशांच्या देखरेखीखाली तपास 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात चार शेतकरी, एक पत्रकार आणि अन्य तीन जण ठार झाले होते. याप्रकरणी सोमवारी (ता.८) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात चार शेतकरी, एक पत्रकार आणि अन्य तीन जण ठार झाले होते. याप्रकरणी सोमवारी (ता.८) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी उत्तर प्रदेश सरकारने तयार केलेल्या अहवालावर न्यायालयाने नाराजी दर्शवली असून आणखी काही साक्षीदारांचा तपास केल्याशिवाय अहवाल पूर्ण होऊ शकत नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे. 

ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी उत्तर प्रदेश सरकारतर्फे न्यायालयाला सांगितले, की लॅबचे अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत येतील. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला विचारले की फक्त आशिष मिश्रा यांचाच फोन का जप्त करण्यात आला, इतरांचे फोन अद्याप जप्त का केले नाही? असा सवाल विचारला. या घटनेमध्ये पुराव्याची अफरातफर होऊ नये म्हणून तपासावर देखरेख ठेवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांची नियुक्त करत असल्याचे न्यायालयाने सांगितले. न्यायमूर्ती राकेश कुमार जैन (निवृत्त) किंवा पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित सिंग (निवृत्त) लखीमपूर खेरीच्या तपासावर देखरेख करू शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने सुचविले आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण? 
गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलनामध्ये चारचाकी गाड्या घुसवून शेतकऱ्यांना चिरडण्यात आले होते. यामध्ये चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर उत्तर प्रदेशसह देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. याप्रकरणी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलासह काही जणांना अटक करण्यात आली. तसेच न्यायालयाने देखील या घटनेची दखल घेतली आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
घरच्या घरी भाजीपाल्यासाठी ‘जिजाई नॅनो...सोलापूर ः घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने आणि अगदी...
बलून बंधाऱ्यांसाठी गिरणा परिक्रमा सुरू जळगाव ः  गिरणा नदीवर प्रस्तावित बलून...
घाटणे बॅरेजमध्ये गेलेल्या जमीनीची...सोलापूर ः मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन...
पुणे जिल्ह्यात ९ हजारांवर कुटुंबांना...पुणे ः ‘‘राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जिल्ह्यात...
पाटण तालुक्यात पुराच्या धोक्याकडे...मोरगिरी, जि. सातारा : तालुक्यात वाढत्या पावसाच्या...
मराठवाड्यात २१ लाख २१ हजार हेक्‍टरवर...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा रब्बी पेरणीत आजवर २१...
परभणी, हिंगोलीत ‘शेतमाल तारण’द्वारे दोन...परभणी ः ‘‘शेतीमाल तारणकर्ज योजनेअंतर्गत परभणी...
‘सिद्धेश्वर’ च्या अध्यक्षपदी काडादी, ...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर...
सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळावर... सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
लासलगाव येथे खत विक्रेत्याकडून जादा...नाशिक: रब्बी हंगामातील पेरण्या सुरू असून काही...
उष्णता ताणाचे वासराच्या आरोग्यावर दीर्घ...दुधाळ जनावरांवर उष्णतेच्या ताणाचा...
नांदुरा येथे कापसाचे दर नऊ हजार रुपये...नांदुरा, जि. बुलडाणा ः कॉटनबेल्ट म्हणून ओळख...
वाशीम जिल्ह्यात रब्बी हंगाम अर्ध्यावर;...रिसोड, जि. वाशीम ः यंदाचा रब्बी हंगाम अर्ध्यावर...
अमरावती जिल्ह्यातील १९५९ गावांत...अमरावती : परतीच्या पावसाने जिल्ह्यातील २ लाख...
कवठेमहांकाळ तालुक्यात पिकाचे पंचनामे...घाटनांद्रे, जि. सांगली ः कवठेमहांकाळ तालुक्यात...
पुणे जिल्ह्यातील १ हजार शेतकरी होणार...पुणे ः जिल्ह्यात १ हजार शेतकरी कृषी निर्यातदार...
आजरा तालुक्यात यंदा ३०० हेक्टरवर रब्बी...आजरा, जि. कोल्हापूर आजरा तालुक्यात जमिनीला वापसा...
नांदेड जिल्ह्यात अवकाळीचा दोन हजार...नांदेड : जिल्ह्यात २९ डिसेंबर रोजी झालेल्या...
शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य...यवतमाळ : शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य...
अनुकूल स्थिती होताच शर्यतींना परवानगी ः...पुणे ः ‘‘राज्यात कोविडमुळे काही भागांमध्ये...